वाई तालुका काँग्रेस कमिटीचा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या न्याय्य मागण्यांबाबत बेमुदत धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा
Satara News Team
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm
- बातमी शेयर करा
वाई : वाई तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात गेले 19 दिवस चालू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वाई पंचायत समिती येथे चालू असलेल्या बेमुदत संपाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
महिला व बालकल्याण खात्याअंतर्गत महाराष्ट्रात सुमारे 125000 महिला अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. मागील सुमारे 23 वर्षांपासून या महिला अत्यल्प पगारावर समाजातील लहान मुले घडविण्याचे काम करत आहेत.लहान मुलांवर योग्य ते संस्कार झाले, शिक्षण झाले तर भविष्यामध्ये एक चांगली पिढी तयार होईल आणि राष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचा मोठा हातभार लागेल या सर्व प्रक्रियेमध्ये सुरुवातीचा पायाचा दगड या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत. परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.
आज गेले 19 दिवस झाले संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे विविध प्रमुख मागण्या घेऊन बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे तरीसुद्धा राज्य सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. जर काही दिवस असेच चालू राहिले आणि राज्य सरकार त्यांच्याकडे लक्ष देणार नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू व तीव्र आंदोलन करू असे आश्वासन वाई खंडाळा महाबळेश्वर चे काँग्रेसचे युवा नेते जयदीप दादा शिंदे यांनी यावेळी आंदोलन स्थळी दिले.
यावेळेस चांदवडी गावचे लोकनियुक्त सरपंच व प्रदेश सरचिटणीस जयदीप शिंदे, वाई तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विलास बापू पिसाळ, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह देशमुख, जिल्हा सरचिटणीस अतुल संकपाळ, सेवादल वाई तालुका अध्यक्ष काशिनाथ पिसाळ,वाई तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जायगुडे, उपाध्यक्ष अरुण शिंदे, सरचिटणीस संदीप नेवसे,वाई विधानसभा युवक अध्यक्ष सचिन काटे, पांडुरंग शिंदे, नामदेव दौंड, किशोर पाटील,राजकुमार जगताप, माधवी तांबे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 23rd Dec 2023 02:59 pm













