मेहनत केली तर मेहनतीचे फळ निश्चितच मिळते - रामभाऊ जाधव
निसार शिकलगार
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
- बातमी शेयर करा

पुसेगाव: आज कुठल्याही क्षेत्रामध्ये मेहनत ही घ्यावीच लागते आणि मेहनत केली तर त्या मेहनतीचे फळ निश्चितच मिळत असते, हे स्पर्धेचे युग आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू झाली आहे. आणि या स्पर्धेत कुमारी साक्षी जाधव हिने नेट परीक्षेत आपल्या जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले आहे, असे गौरवउदगार भटक्या विमुक्त संघटनेचे राज्य सरचिटणीस रामभाऊ जाधव यांनी व्यक्त केले आहे.
सन 2023 मधील नेट परीक्षेमध्ये कुमारी साक्षी अंकुश जाधव म्हसवड तालुका माण हिने 720 पैकी 605 गुण मिळवून यश संपादन केले, या यशाबद्दल भटक्या विमुक्त संघटनेच्या माध्यमातून साक्षी जाधव हिचा म्हसवड तालुका माण येथे संघटनेचे राज्य सरचिटणीस रामभाऊ जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, साक्षी जाधव यांचे शिक्षण प्राथमिक व माध्यमिक तासगाव येथे झाले होते, त्यानंतर अकरावी व बारावी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील श्रद्धाअकॅडमी मध्ये झाले. वडील हे शेती विभागामध्ये कृषी अधिकारी म्हणून नोकरीस असून मध्यमवर्गीय व भटक्या विमुक्त समाजातील कुटुंब वडिलांचे असलेले मोलाचे योगदान या जोरावर साक्षी जाधव हिने नेट परीक्षेत चांगल्या प्रकारे यश संपादन केले, तिचा संघटनेच्या माध्यमातून गौरव करून असे सन्मान केल्याने या समाजातील मुलांना एक प्रोत्साहन मिळेल म्हणूनच असे कार्यक्रम राबवणे गरजेचे असल्याचे मत ही रामभाऊ जाधव यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जगन्नाथ जाधव, अंकुश जाधव व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 3rd Aug 2023 12:18 pm