दोन रिव्हॉल्वर, बँकेत कोट्यावधींच्या FD, बायको आणि स्वत:च्या नावावर मुंबईत फ्लॅट, अलिबागमध्ये जमीनी;राऊत यांची एकूण मालमत्ता किती

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांना अखेर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने(ED)अटक केली आहे. रविवारी सकाळी सातच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने संजय राऊतांच्या विक्रोळी येथील मैत्री या निवासस्थानी धाड टाकली. तब्बल साडे तास तासांच्या चौकशी नंतर ईडी अधिकाऱ्यांनी संजय राऊंताना ताब्यात घेत हा हाय व्होल्टेज ड्रामा संपवला आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांवर ही कारवाई झाली आहे. मात्र, या कारवाईच्या निमित्तामे पुन्हा एकदा संजय राऊतांची प्रॉपर्टी चर्चेत आली आहे. संजय राऊतांच्या नावे बँकेत कोट्यावधीच्या FD आहेत. तर बायको आणि स्वत:च्या नावावर मुंबईत फ्लॅट तसेच अलिबागमध्ये जमीनी देखील आहेत. राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरताना राऊतांनी प्रतिज्ञापत्रावर त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली होती. यामुळे आता संजय राऊत यांची एकूण मालमत्ता किती आणि ईडीने जप्त केलेली मालमत्ता किती? याचा हा आढावा.

दीड लाख कॅश, दोन रिव्हॉल्वर आणि एक कार

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना संजय राऊतांनी त्यांची मालमत्ता प्रतिज्ञा पत्राद्वारे जाहीर केली होती. 1 लाख 55 हजार 772 रूपयांची कॅश आणि बँकेत 1 कोटी 93 लाख 55 हजार 809 रूपये असल्याचे राऊतांनी प्रतिज्ञा पत्रात नमूद केले होते. तसेच आपल्या नावार एक वाहन असून ते 2004 मध्ये खरेदी केल्याचे राऊतांनी प्रतिज्ञा पत्रात लिहीले होते.

पत्नीकडे सोनं 729.30 ग्रॅम सोनं

पत्नी वर्षा यांच्याकडे 729.30 ग्रॅम सोनं दागिन्यांच्या स्वरूपात असल्याचे संजय राऊतांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद होते. या सर्व दागिण्यांची किंमत 39 लाख 59 हजार 500 रूपये आहे. तर एक लाख 30 हजार रुपयये किंमतीचे 1820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दिगीने आहेत.

बँकेत 3 कोटी 38 लाखांची FD

संजय राऊत यांच्या नावावर बँकेत ठेवा अर्थात FD देखील आहेत. या FD 3 कोटी 38 लाख 77 हजार 666 असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले होते.

संजय आणि वर्षा राऊत यांची कमाई किती?

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये ईडीने अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने ही कारवाई केली होती. संजय राऊतांची एकूण 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांच्या स्थावर मालमत्ता आतापर्यंत ईडीने जप्त केली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त