अजंठा चौक येथील फ्लायोवरच्या सुशोभीकरणाचा नारळ फुटला. निधी कमी पडू देणार नाही,उदयनराजे यांची ग्वाही
Satara News Team
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
- बातमी शेयर करा
सातारा : अजंठा चौक येथील फ्लायओव्हरच्या सुशोभीकरणाचा नारळ खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फोडण्यात आला . वीर जवान या संकल्पनेवर आधारित एक सुंदर डिझाईन या पुला . अंतर्गत जागेत तयार करण्यात येणार आहे यावेळी बोलताना हद्द वाढ क्षेत्रातील भागाला कधीही निधी कमी पडू देणार नाही पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत अशी स्पष्ट ग्वाही छ उदयनराजे यांनी बोलताना दिली
सातारा शहराच्या हद्दवाढीतील क्षेत्रासाठी राज्य शासनाने 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे शहराच्या पूर्व भागांमध्ये विकास कामांचे नारळ फुटले यामध्ये अजंठा चौकातील फ्लायओव्हर अंर्तगत जागा सुशोभीकरणाचा कार्यक्रम अंतर्भूत होता यासंदर्भात उदयनराजे समर्थक संग्राम बर्गे यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे . खासदार छ उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी या कार्यक्रमाचा नारळ फोडण्यात आला
यावेळी युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे आबा शिंदे विठ्ठलराव जाधव संजय चव्हाण विक्रम पवार राहुल पाटोळे सुधीर भोसले सुरेश महाडिक नवनाथ इंदलकर सचिन घाडगे विशाल नलावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार छ उदयनराजे भोसले म्हणाले आपला जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे त्यांच्या स्मरणार्थ पुणे बेंगलोर नॅशनल हायवे येथे अजंठा चौक परिसरातील फ्लाय ओव्हर अंतर्गत येणाऱ्या भागात वीर जवान या संकल्पनेवर आधारित सुंदर डिझाईन बनवून एक स्मृती स्थळ तयार करण्यात येणार आहे विलासपूर संभाजीनगर कोडोली या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे येथे कुठल्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही छ उदयनराजे भोसले यांनी दिली
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sat 11th Mar 2023 04:42 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 11th Mar 2023 04:42 pm













