मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याचे आरोपावरुन एकास 10 वर्षे कारावास व 5,000/- रुपयांचा दंड ठोठावला.

अपर जिल्हा व सत्र न्यायालय कराड मा‌ . होरे मॅडम न्यायालयाचा निकाल उंब्रज पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांचे तपास योगदानास यश.

उंब्रज   : उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गांवात दिनांक १९.०५.२०२० रोजी सकाळी ११.०० ते ११.३० वा. चे सुमारांस फिर्यादीची मतिमंद २८ वर्षीय मुलीस उचलून नेवुन ऊसात तिचेवर शारीरीक  अत्याचार केल्याबद्दल प्राप्त फिर्यादीवरून उंब्रज पोलीस स्टेशनला गुन्हा रजि.नं. २४६/२०२० भादंविस क .३७६ (३)(ल) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मोहन तलबार, सहा पो उपनिरीक्षक  संजय देवकुळे ,यांनी कसोशिने करुन आरोपीचा शोध घेवून त्यांस ताब्यात घेतले होते. आरोपीस अटक केले मा.न्यायालयात पेशी केली होते सदर गुन्ह्याचा परिपुर्ण  तपास करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर केले होते व दोषारोपपत्र  दाखल केला होते.
सदर खटला मा. अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश सो कराड , श्रीमंत होरे मॅडम  यांचे न्यायालयात  चालला होता जिल्हा सरकारी वकिल आर.सी.शहा यांनी खटल्याचे कामकाज पहीले.  सदर केसमध्ये ०८ साक्षीदार तपासणेत आले. साक्षीदार.पंचांच्या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे मा. न्यायाधीश साहेब यांनी ग्राह्य धरून आरोपी तानाजी विष्णू निकाळजे. वय ३५ वर्षे .रा. कोर्टी ता.कराड यांस १० वर्षे कारावास व रुपये  ५,०००/- दंडाची शिक्षा  ठोकवली आहे . सदर केसमध्ये विशेष  परिश्रम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग डॉ.श्री. रणजित पाटील सो, प्रभारी अधिकारी उंब्रज पो.स्टे.सपोनि.श्री.अजय गोरड यांनी घेतले .उंब्रज पोलीसांनी कसोशिने तपास करून मा. न्यायालयात  योग्य दोषारोपपत्र दाखल करुन पुरावे योग्य पध्दतीने  सादर केल्याने उंब्रज पोलीसांची लौकीकात आणखी भर पडली आहे. 
मा. श्री. समीर शेख , पो.अधीक्षक  सो. बापू बांगर , अप्पर पोलीस अधीक्षक सो सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग,  डॉ.श्री. रणजित पाटील, उंब्रज पोलीस स्टेशनचे  प्रभारी अधिकारी सपोनि  अजय गोरड यांचे मार्गदर्शनाखाली  पैरवी अंमलदार  पो. कॉ‌.प्रमोद पाटिल,  पो.कॉ प्रकाश कार्वेकर यांनी सदर खटल्यामध्ये  योग्य ती मदत केली‌ आहे.
                  सपोनि श्री. अजय गोरड  उंब्रज पोलीस स्टेशन  
                   सदर गुन्हा तील घटना खरी होती

        एका गरीब व मतीमंद मुलीवर  झालेल्या अत्याचार विरूद्ध आरोपीस तात्काळ अटक करून पुरेसा पुरावा गोळा करून मा.न्यायलयात दाखल केला होता‌.
       साक्षी पुरावे आधारे आरोपीला शिक्षा झालेली आहे. पिडीत मुलीस न्याय देण्यास उंब्रज पोलीस टिमला यश आले आहे

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!

स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!

मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक

मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक

हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला