सातारा जिल्ह्यात महायुती चा डंका... जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम
Satara News Team
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती ने महाविकास आघाडी ला धोबीपछाड दिला असल्याची माहिती भा ज पा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी दिली
सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपैकी पैकी भाजपा 59,शिवसेना शिंदे गट 27, राष्ट्रवादी अजितदादा गट 21 अशा एकूण महायुतीला 107 ग्रामपंचायतीत यश मिळाले तर महाविकास आघाडीला फक्त 20 ग्रामपंचायतीत समाधान मानावे लागले, सातारा जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे मत धैर्यशीलदादा कदम त्यांनी व्यक्त केली
महायुतीला मिळालेल्या विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार,सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई,खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,आमदार जयकुमारभाऊ गोरे,आमदार महेश शिंदे,डॉ.अतुल भोसले,श्री मदनदादा भोसले,श्री नरेंद्र दादा पाटील,डॉ सौ प्रियाताई शिंदे,श्री मनोजदादा घोरपडे,श्री विक्रम पावसकर,श्री सुनीलतात्या काटकर,श्री रामकृष्ण वेताळ यांनी अभिनंद केले.
महायुतीच्या विजयाचा महामेरू आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीतही असाच पुढे जाईल आणि महाविजय २०२४ साकार करेल. या विजया बद्दल भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो असे सूचक वक्तव्य जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी केले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 6th Nov 2023 08:45 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 6th Nov 2023 08:45 pm













