श्री. छ. खा. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज -श्रीमंत कोकाटे , डॉ मच्छिंद्र सकटे

  सातारा :  छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखा सच्चा पुरोगामी व छत्रपतींच्या गादीचे विद्यमान वारसदार निवडून यावे यासाठी सर्व समाज जाहीर पाठिंबा देत आहे. त्यामुळे आता मताधिक्य किती ? याची उत्सुकता लागली असल्याचे मत इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे व दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.           

 

   सातारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवडणुकीकडे देश नव्हे तर परदेशातही लक्ष लागून राहिलेले आहे. कारण, हा छत्रपतींच्या गादीचा मान आहे . मत सुद्धा छत्रपतींना आहे. ते सर्वांचे दैवत आहेत. तसेच राष्ट्रीय अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीची त्यांना जाण असून मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे.         गेल्या ४० वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथी  इयत्ता इतिहास पुस्तकात चुकीचा संदर्भ घेऊन इतिहास सांगितला जात होता.  ही बाब जेव्हा त्यांच्या समजली . त्यावेळी त्यांनी ताबडतोब सरकारला हे पुस्तक बदलण्यास भाग पाडले. त्यामुळे अशा लोकराजा असलेल्या नेत्याला निवडून देणे हा सातारच्या गादीचा सन्मान आहे. असे स्पष्ट केले. जात , धर्म यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करणारे ते लोकशाहीतील खरेखुरे राजे आहेत. पक्षांतर्गत प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण झाली असून ते कोणत्याही पदासाठी झुकणारे व्यक्तिमत्व नाही. त्यामुळेच त्यांना सर्व समाजाकडून पाठिंबा मिळत आहे. आम्ही छत्रपतींचे मावळे असून संविधानात्मक बोलतो असे श्री कोकाटे यांनी स्पष्ट केले.                  

 

    डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले की, आम्ही कुणीही दहशतवादी किंवा अतिरेकी नसून दलित महासंघाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना न्याय देण्याचे काम करत आहे . आम्हाला नेहमीच छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सक्रिय पाठिंबा मिळालेला आहे. एवढेच नव्हे तर माझ्यासारख्या सामान्य  कुटुंबातील व्यक्तींच्या घरी येऊन त्यांनी पोहे खाल्लेले आहेत .इतरांना बाबतीत न बोललेले बरे अशी विरोधकांवर त्यांनी टीका केली.                    

     सध्या स्वतःची कर्तबदारी सांगता येत नाही. त्यामुळे संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार? अशी  भूलथाप दिली जाते. खरं म्हणजे अनेक वर्ष राजकारणामध्ये स्थिरता असून सुद्धा ज्येष्ठ नेत्यांना खोटं बोलणं वावडे वाटत नाही. याचेच आश्चर्य वाटत आहे.          

    आरक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहे त्यांना सुद्धा ते बदलणे अशक्य आहे. त्यामुळे आरक्षण हे मोदींनी अधिक घट्ट करून ठेवलेले आहे. तसं पाहिलं तर छत्रपतींची गादी म्हणून उदयनराजे भोसले निवडून नक्कीच येतील. पण, त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य देणे. हे त्यांच्या गादीचा मान राखण्यासारखा होईल . लोकराजा असलेले उदयनराजे भोसले यांच्या विजयाकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर  परदेशाचेही लक्ष लागलेले आहे. भाजपने काय केलं तर भाजपने जे काँग्रेसला करता आले नाही ते केले आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, लंडनचे घर स्मारक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव या ठिकाणी स्मारक, लहुजी वस्ताद यांचे स्मारक आणि मागासवर्गीयांना शिक्षणामध्ये व अनेक ठिकाणी त्यांची गुणवत्ता वाढीसाठी बार्टी, आरर्टी  अशा संस्था उभा करण्याचे काम हे भाजप म्हणजेच महायुतीने केलेले आहे. खरं म्हणजे कोल्हापूरची गादी ही धाकटी आहे. त्या गादीच्या महाराजांना निवडून द्या आणि थोरल्या गादी बदल वेगळी भूमिका घेणारे शरदचंद्र पवार यांना त्यांच्या पुतण्याने चोख  उत्तर दिलेले आहे. त्यामुळे आपल्याला छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडून देण्यासाठी व मताधिक्य देण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला सातारा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के, सामाजिक कार्यकर्ते व दलित चळवळीतील खंदे समर्थक पोपट उमापे, उमेश खंडझोडे, अमोल पाटोळे उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त