लंपी चर्म रोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या बाजारावर व वाहतुकीवर बंदी

सातारा  : गोवर्गीय जनावरांमध्ये सांगली, कोल्हापूर व सोलापूर  या शेजारील जिल्हयात लंपी चर्म रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. तसेच सातारा जिल्हयातील कराड व फलटण तालुक्यात तुरळक ठिकाणी लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयातील सर्व गोवर्गीय बाजार तसेच गोवर्गीय जनावरांच्या  वाहतुकीवर पुर्ण बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे  आदेश प्रभारी #Collector

जीवन गलांडे यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.  
या आदेशानुसार  जिल्ह्यातील आठवडा बाजारात गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री तसेच गोवर्गीय जनावरांची वाहतूक करणेत येवू नये. जनावरांचे प्रदर्शन, यात्रा, तसेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन पुढील आदेश होईपर्यंत करणेत येऊ नये.
फलटण, कराड, कोरेगाव व माण या तालुक्यातील 9 गावांमध्ये लंम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. यामध्ये 26 गाय व 15  बैल असे एकूण 41 जनावरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर एका जनावराचा मृत्यु झाला असून 3 जनावरे नियमित औषधाने बरी झाली आहेत.
जिल्हयातील एकूण 3 लाख 52 हजार 436 गोवर्गीय जनावरांपैकी 3 लाख 23 हजार 67  जनावरांचे लंपी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून उर्वरित जनावरांची लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. सर्व पशुपालकांनी आपल्या गोवर्गीय जनावरांना लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन करणेत येत आहे. रोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी  पशुपालकांनी जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत व वरचेवर गोचीडनाशक औषध फवारणी करावी. जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून उपचार करुन घ्यावेत. गावात जनावरांमध्ये रोग प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने किटकनाशक औषध फवारणी वरचेवर करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विजय सावंत केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला