जिशान मुल्ला चे नवोदय प्रवेश परीक्षेतील यश कौतुकास्पद - देविदास कुलाळ

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ही कायम उत्तमच राहिली आहे

सातारा : जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे निवड झाल्याबद्दल जिशान जावेद मुल्ला याचा सत्कार राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपसंचालक देविदास कुलाळ यांचे हस्ते करण्यात आला. केंद्र समूह म्हसवड नं.२ ची शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा आसाळवाडा येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती, त्यास भेट देण्यासाठी उपसंचालक देविदास कुलाळ या ठिकाणी आले होते. त्यांच्यासमवेत माणचे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे उपस्थित होते.
         ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी नवोदय विद्यालय येथे प्रवेशास पात्र होतो, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे असे गौरवोदगार कुलाळ यांनी काढले. ते पुढे असे म्हणाले, की अजूनही आपल्या ग्रामीण भागातील गुणवत्ता वाढवण्यावर सर्व शिक्षकांनी भर द्यावा लागेल. जिशान याने जिल्हा परिषद शाळेत राहून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा गुणवतेत कोठेही कमी नाहीत हे दाखवून दिले असल्याचे मत माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी मांडले. जिल्हा परिषद शाळांनी आपल्या शाळेचा पट वाढवण्याबरोबर गुणवत्तेत ही वाढ करणे काळाची गरज बनली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
       जिशानला इयत्ता पहिली ते चौथीला मार्गदर्शन करणाऱ्या मुल्ला मॅडम व चोपडे मॅडम तसेच वर्ग शिक्षक जावेद मुल्ला यांचेही कौतुक करण्यात आले.याप्रसंगी उपसंचालक कुलाळ यांचा सत्कार धुळदेवचे मुख्याध्यापक पतंगे तर श्री. पिसे यांचा सत्कार शरद शिर्के यांनी केला. शिक्षण परिषदेचे नियोजन केंद्रसंचालक रमेश कापसे यांच्या नियोजना खाली करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्र समूह म्हसवड नं. २ मधील सर्व प्राथमिक शाळांचे व माध्यमिक शाळांचे शिक्षक वृंद उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त