राम लल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी पाटण तालुका सज्ज

 पाटण : देशावर परकीय आक्रमणे झालेली आहेत. त्या  आक्रमणामध्ये सुमारे पाचशे वर्षांपासून आयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारण्याचा संकल्प रामभक्तांचा असून, त्यात आता मृत स्वरूप येत आहे. 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यामध्ये संपूर्ण देश तयारीत व्यस्त आहे. पाटण तालुक्यामध्ये गावोगावी ही  या उत्सवाची जयत तयारी सुरू आहे. तालुक्यातील सर्व गावात, शहरात, प्रत्येक घरात मंगल अक्षदा आणि निमंत्रण पत्रिका पोचवल्या जात आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये तयारी सुरू असून एकूण उत्साहाचे वातावरण आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, विक्रम बाबा पाटणकर यांना सुद्धा निमंत्रण पत्रिका तालुक्याच्या वतीने दिल्या गेल्या आहेत.
   प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारण्याचा संकल्प शेकडो वर्षापासून चा राम भक्तांचा आहे त्यांचा लढा हा फार जुना आहे असे म्हटले जाते, त्यांच्या लढ्याला मूर्तरूप आता आलेले आहे. दिनांक 22 रोजी आयोजित अयोध्या  येथे प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्या सोहळ्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने पाटण तालुक्यात सुद्धा प्रत्येक गावात विविध प्रकारचे कार्यक्रम त्या दिवशी ठेवण्यात आलेले आहेत. पाटण तालुक्याच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत मंगल अक्षता,कलश,निमंत्रण पत्रिका पोचवलेल्या आहेत. भैरवगड,मारवंड, कोयना, मोरगिरी विभाग, मल्हारपेठ, पाटण शहर, काठी अवसरी, संपूर्ण पठारावर, 22 तारखे दिवशी मोठ्या प्रमाणात दुसरी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. प्रत्येक मंदिरात भजन कीर्तन, हरिपाठ, ठेवण्यात आलेला आहे. येराड, त्रीपुडी, शिरळ तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 22 जानेवारी रोजी पाटण  येथे ठिकठिकाणी  रांगोळी रस्त्यावर काढण्यात येणार आहे. लायब्ररी चौक,श्रीराम मंदिर या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. तालुक्यात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नियोजन अगदी उत्साहात सुरू आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त