तगडा उमेदवार द्या, म्हणून बोंबा मारताय. काळजी करू नका....मिशीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम लावलाय. आता वेळ आली माणच्या दाढीवाल्याची.

 दहिवडी  :कोणीही तगडा उमेदवार द्या. महाविकास आघाडीने तगडा उमेदवार दिल्यावर मग कशाला पाय लावून पळत होता, असा प्रश्न शेखर गोरेंनी उपस्थित केला आहे. आताही विधानसभा निवडणुकीला तगडा उमेदवार द्या, म्हणून बोंबा मारताय. काळजी करू नका यावेळी जनतेने अन महाविकास आघाडीने ठरवलंय तुमच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा ते. तुमचा कार्यक्रम होणार हे एवढच लक्षात ठेवा, असा इशारा शेखर गोरे यांनी दिला आहे

 

लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीने लोकशाही मार्गाने लढवली. भाजपला समोर पराभव दिसू लागल्याने त्यांनी पैशांचा बाजार केला. त्यांनी पैसे नसते वाटले तरी महाआघाडीचा उमेदवार अडीच ते तीन लाख मतांच्या फरकाने विजयी झाला असता. तुमच्या हट्टापोटी व हुकुमशाही पध्दतीमुळे भाजपचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ हातचा गेला आहे, हे मान्य करा. खासदारकीच्या निवडणुकीत पण विजय आमचाच होणार, अशाच बोंबा मारत होते.

 

शेखर गोरे यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाचा ठेका घेतल्यासारखं वागू नये. लोकशाहीत सर्वांना समान हक्क आहे. त्यामुळे कोण गाठीभेटी घेईल, कार्यक्रमाना उपस्थिती दाखवेल, निवडणूका लढवेल हे ज्याच्या त्याच्या मर्जीने करेल.माण-खटाव मतदारसंघात विधानसभा निवडणूक कोण लढवणार ते महाविकास आघाडी व आमच आम्ही बघू. महायुतीच्या सर्व्हेत आपलीच उमेदवारी राहतेय की नाही शंका आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळतेय का ते बघा. आम्ही मिशा, दाढी ठेवू नाही तर काढू पण, जिल्हा बँकेच्या निवडणूकीत आम्हीच पाणी पाजलंय. आता विधानसभेलाही जनतेच्या आशीर्वादावर तुमचा कार्यक्रमच करण्यासाठी तयार आहे.

 

लोकसभा निवडणुकीत माणच्या जनतेला आवाहन केले होते की, लोकसभेला फलटणच्या मिशीवाल्याला पाडा अन॒ विधानसभेला माणच्या दाढीवाल्याला पाडा.जनतेने मिशीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम लावलाय. आता वेळ आली आहे ती माणच्या दाढीवाल्याची.मतदारसंघात जयकुमार गोरे यांनी जी दहशत व हुकुमशाही चालवली आहे ती संपवण्याची सुपारीच मी जनतेच्या वतीने घेतली आहे, असा सूचक इशारा जिल्हा बॅंकेचे संचालक शेखर गोरे  यांनी दिला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त