प्रसिद्ध लेखक राजीव तांबे व्हर्च्युली विजयनगर शाळेत लेखकाची विद्यार्थ्यांनी घेतली व्हर्च्युली मुलाखत

लेखकच जेव्हा पाठ शिकवतात विजयानगर मध्ये भरली गोष्टींची शाळा
Famous writer Rajeev Tambe Virtually at Vijayanagar School. The author was interviewed virtually by the students

विजयानगर  :  शनिवार दि. २० ऑगस्ट रोजी माण तालुक्यातील अभिनव प्रयोगाची खाण असणा-या जिल्हा परिषद शाळा विजयनगर पार्यती येथील शाळेत चक्क लेखक अवतरले व त्यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता २ री चा त्यांनी लिहलेला “पाऊसफुले” हा बालभारतीच्या पुस्तकातील  पाठ स्वत: लेखकाकडून शिकण्याची पर्वणी विजयनगरच्या मुलांना मिळाली. लेखका कडूनच पाठ शिकायला मिळाल्याने विद्यार्थी मोठ्या उत्साहात होते. विजयनगर शाळेतील गुगल सन्मानित शिक्षक बालाजी जाधव हे इयत्ता १ ली ते ४ थी ४ वर्गासाठी एकटेच शिक्षक असून ४० विद्यार्थ्यांना शिकवताना विभिन्न प्रयोगा शिवाय शिकवणे एकट्या शिक्षकाला कठीण असते म्हणून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे प्रसिद्ध लेखक राजीव तांबे सर यांना शाळेत व्हर्च्युली निमंत्रित करून मुलांना खुद्द ज्या लेखकांनी पाठ लिहला त्यांच्याकडून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली .लेखक राजीव तांबे यांनी त्यांचा जीवनप्रवास थोडक्यात मुलांना सांगितला त्यानंतर मुलांनी लेखकाची चक्क मुलाखत घेतली यामध्ये १ ली ते ४ थी च्या सर्व मुलांनी खूप सारे प्रश्न विचारून लेखक राजीव तांबे सर यांची यशस्वी मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांच्या बालपणापासून, गोष्टी, त्याचे लेखन, कधीपासून गोष्टी लिहता, एकूण किती गोष्टी लिहल्या, आम्हाला लेखक होता येईल का असे अनेक प्रश्न विचारले व राजीव तांबे सर यांनी अगदी मुलामध्ये मुल होऊन त्यांच्या भाषेत त्यांना समजेल अशा प्रकारे मजेशीर गप्पागोष्टी करत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.इयत्ता ३ री ४ थी च्या विद्यार्थ्यांनी तर लेखकांना तुम्हा आम्हाला २ शब्द सांगा आम्ही लगेच गोष्ट बनवून दाखवतो, मग लेखक शब्द देवू लागले व मुले गोष्टी बनवू लागले. काही विद्यार्थ्यांनी चित्रावरून कॉन्फरन्समध्ये च गोष्टी तयार करू लेखकांचे मन जिंकून घेतले.व मला दर महिन्याला तुमच्याशी बोलायचे असा लेखकांनी हट्ट धरला त्यावर विजयनगरच्या विद्यार्थ्यांनी होकार दिला व आम्हालाही आवडेल असे सांगितले.सध्या स्क्रीन चा काळ फोफावत आहे त्याचा मर्यदित वापर करा व जेवढे वाचन कराल तेवढे तुम्ही लेखन करू शकाल व स्वताला समृद्ध करू शकाल असा मोलाचा संदेश लेखक राजीव तांबे सर यांनी जवळपास १ तास चाललेल्या कॉन्फरन्स मधून दिला.विजयनगर च्या शाळेतील मुलांना हि एक सुंदर पर्वणी लाभली व गोष्टींची शाळा मजेशीर व आनंद देणारी ठरली.त्यांनी मुलांना गोष्टी कशा लिहाव्यात, त्याच्या साठी काय काय करावे लागते, लिहलेल्या गोष्टी प्रसिद्ध कशा कराव्यात, त्याचा इतरांना कसा फायदा होतो, भविष्यात लेखनाचे काय काय फायदे होतात याबद्दलची सर्व माहिती अगदी मुलाना समजेल अशी दिल्याने मुलांना व्हर्च्युली असून सुद्धा इतकी मजा आली की मुले यानंतर कधी भेटूया असे लेखकांना विचारत होते व विजयनगर च्या शाळेत येण्याची विनंती करत होते. शेवटी विद्यार्थ्यांनी एक सुदंर बडबडगीत कृतीतून सादरीकरण करून लेखांकना ही खुश केले व अधून मधून आपली ही गोष्टींची शाळा भरवत जाऊ, गप्पा करू असा मनमोकळा संवाद झाल्याने शिकण्याची एक वेगळी मजा विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला