आजचे राशी भविष्य २४ ऑगस्ट २०२२ आज बुध प्रदोष व्रत, जाणून घेऊया मुहूर्त आणि शुभ योग

आजचा शुभ मुहूर्त ब्रम्ह मुहूर्त सकाळी ०४ वाजून २७ मिनिट ते ०५ वाजून ११ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून ३३ मिनिट ते ०३ वाजून २५ मिनिटांपर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ०२ मिनिट ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०६ वाजून ३९ मिनिट ते ०७ वाजून ०३ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ५७ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत

राहूकाळ १२ वाजून ते ०१ वाजून ३० मिनिटापर्यंत. द्वादशी तिथी सकाळी ०८ वाजून ३१ मिनिटापर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ. पुनर्वसु नक्षत्र ०१ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्राची सुरुवात.

बुधवार, २४ ऑगस्ट २०२२
{आज ज्यांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद}

मेष
आज आपणास उत्तम गृहसौख्य लाभेल. घरातील काही महत्वाची कामे पूर्ण करण्याकडे कल असेल. घरातील स्वच्छतेकडे आज लक्ष द्याल. ज्येष्ठांची सेवा कराल.

वृषभ
आजचा आपला दिवस पराक्रमाचा, शौर्याचा असेल. काही महत्वपूर्ण निर्णय घ्याल. आज कामानिमित्त काही प्रवास संभवतात.

मिथुन
आज पारिवारिक सुखाचा आस्वाद घ्याल.घरी पाहुण्यांची रेलचेल संभवते. सर्वांच्या साथीने उत्सवाची तयारी कराल. आपल्या आवडी निवडी जोपासाल.

कर्क
आजचा दिवस हा आपलाच आहे. आजचा दिवस अतिशय उत्साहात,आनंदात व्यतीत कराल. जोडीदाराचे भरभरून प्रेम आज प्राप्त कराल. आपणही जोडीदाराला वेळ द्याल व दिवस मजेत घालवाल.

सिंह
आजचा आपला दिवस मनस्तापाचा, चिंतेचा जाऊ शकतो. प्रकृतीकडेही लक्ष द्यावे लागेल. कुटुंबावर काही खर्च देखील संभवतात. आज शांतपणे विचार करून कृती करावी.

कन्या
आजचा आपला दिवस इच्छापूर्तीचा आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीचे, परिश्रमाचे फळ आज आपणास प्राप्त होईल. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.

तुळ
आजचा आपला दिवस कामात व्यग्र जाईल. दिवसभर कामाचा बोजा राहिलं. मात्र आपण आपल्या कठीण परिश्रमाने असाध्य ते साध्य करून दाखवाल.

वृश्चिक
आजचा आपला दिवस भाग्य प्राप्तीचा राहिलं. इतक्या दिवसांपासून घेत असलेल्या कष्टाचे आज चीज होईल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल.

धनु
आजचा दिवस काहीसा अडचणी, अडथळ्यांचा असेल. विनाकारण मनस्ताप संभवतो. मात्र आपण फक्त आपल्या नित्य कामावर लक्ष केंद्रित करा.

मकर
आजचा आपला दिवस उत्तम जाईल. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या भावना, मताचा आदर करा.

कुंभ
आजचा आपला दिवस काहीसा तणावयुक्त जाईल. प्रकृती अस्वास्थ्य जाणवू शकते. आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक राहिलं. कोणावरही अतिविश्वास ठेवू नये.

मीन
आजचा दिवस नव उत्साहाचा, ऊर्जेचा असेल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना काही नवीन संधी प्राप्त होतील. विद्यार्थी वर्गाला अभ्यासासाठी उत्तम दिवस राहील. आज संततीसोबत दिवस मजेत जाईल.

 

आजचा अशुभ मुहूर्त

राहूकाळ १२ वाजून ते ०१ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ०७ वाजून ३० मिनिटापासून ते ०९ वाजेपर्यंत यमगंड असेल. सकाळी १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ असेल. दुर्मुहूर्त काळ दुपारी ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ४९

 

सौ . कांचन थिटे 
ज्योतिष, अंक वास्तू शास्त्र प्रवीण, विवाह (m.s)

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त