सर्वसामान्य माणसांना संपकरी कर्मचाऱ्यां बद्दल पडलेले काही प्रश्न.

सोशल मीडिया मध्ये व्हायरल होणाऱ्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार काय?

सातारा : सरकारी नोकर खाजगी क्षेत्रातील लोकांना पण पेन्शन मिळावी, शेतकऱ्यांना पण मिळावी म्हणून मागणी का करत नाहीत? आणी पेन्शन बंद होऊन १८ वर्षे झाली आत्तापर्यंत काय करत होते. बंद केली तेव्हा काय करत होते? शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तशा सरकारी कर्मचाऱ्यांनी किती आत्महत्या केल्या? आकडेवारी देऊ शकता का? सरकारी कर्मचारी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन का करत नाहीत? काम हे काम असते. त्याचे तुम्ही पेमेंट घेता. लोकांवर उपकार करत नाही. तुम्ही करता ती सेवा नाही तर नोकरी आहे.  
        शेतकऱ्यां इतके कष्ट तुम्ही करत नाही. ॲन्टी करप्शन ब्युरो सरकारी नोकरांसाठीच का स्थापन करण्यात आला असावा? खाजगी क्षेत्रातील व शेतकऱ्यांसाठी का नाही? एकदाचं सांगुनच टाका तुमची पोटं सामान्य कष्टकऱ्यांसारखीच आहेत की Larg XL+ आहेत. तुम्हाला पेन्शन पाहिजे, तुमच्या नंतर पत्नीला पण पाहिजे,अनुकंपा कोट्यातून पोरांना नोकरी पण पाहिजे. तुम्हाला समाधानाचा ढेकर येणार तरी कधी? तुम्ही जर एवढे प्रामाणिक आहात मग सुट्टीच्या दिवशीच्या पगाराला नकार का देत नाही. तुम्ही जर कष्टाळू आहात, लो प्रोफाइल आहात,तुमचे पाय जमिनीवर आहेत मग लोकांना ५० हेलपाटे का घालावे लागतात?  बोजा चढण्यासाठी उतरवण्यासाठी लोकांना पैसे का द्यावे लागतात? खरेदी केलेल्या मिळकतीवर नामांतर करण्यासाठी पैसे का द्यावे लागतात? तुम्ही असताना मेलेल्या माणसाच्या मिळकती कशा विकल्या जातात? तुम्ही असताना एक प्राॅपर्टी ३/४ माणसांना कशी विकली जाते. तुम्ही असताना गौण खनिज उत्खनन कसे होते? तुम्हां लोकांना कोणत्याही मार्गाने आलेला पैसा प्रिय कसा असतो. तुम्ही कर्तव्यात कसूर करत नाही मग "सरकारी काम सहा महिने थांब" हि म्हण प्रचलित कशी झाली? "हात गरम करणे" "चहापाणी" "टेबलाखालुन" " फाईलवर वजन ठेवणे" "चिरीमिरी" या शब्दांचे अर्थ जरा इस्कटून सांगाल का? तुमच्याच खात्यातील लोकांचे प्रवास भत्ते मिळण्यासाठी कमिशन घेता का नाही? कोणत्याही प्राॅपर्टीचे हस्तांतरण सरकारला भरलेल्या स्टॅम्प ड्युटीत का होत नाही?       
            असं कोणतं काम आहे जे तुम्ही विनामोबदला करता? रेव्हेन्यू व RTO, पोलिस खाते बदनाम का आहेत? RTO ऑफिस मध्ये कोणतेही काम करताना एजंटची गरज का लागते? विना एजंट काम करायचे म्हणले की तारीख पे तारीख का मिळते? कोणत्याही ऑफिस, शालेय खरेदीत कमिशनखोरी होते की नाही? तुम्ही जर इतके चांगले गुरुजी,शिक्षक,सर,प्रोफेसर आहात मग कोचिंग क्लासेस कसे उदयाला आले? सरकार तुम्हाला ५० हजारा पासुन १/१.५ लाख पगार देत असताना शालेय व ११/१२ वी च्या विद्यार्थ्यांना १/२ लाख घालवून क्लासेस का लावावे लागतात? क्लासेस विरोधात तुम्ही आंदोलन का करत नाही? तुम्ही गुरुतुल्य असताना पेपर कसे फुटतात? काॅप्या पुरवुन परिक्षा कशा होतात? दुर्जनांना खाकीचा दरारा वाटण्याऐवजी सज्जनांना का वाटतो? "पोलिस स्टेशन आणी कोर्टाची पायरी चढू नये" असे लोक का म्हणत असावेत? सरकारी हाॅस्पिटल मधील पेशंटांना खाजगीत जाण्यासाठी रेफर कोण करते? सरकारी लॅब असताना खाजगी लॅब रेफर का केल्या जातात? सक्षम वनखाते असताना वृक्षतोड कशी होते? एकच रस्ता २० वर्षात १० वेळा का करावा लागतो? राजकारणी, भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांची प्रकरणे तुम्ही व्हिसल ब्लोअर म्हणून का उघडकीस आणत नाही?  "काम लाल फितीत अडकणे" म्हणजे काय? किंवा "लालफिताशाही" म्हणजे काय सांगाल का? शेतकरी जास्त उत्पादन घेत आहेत इतके की भाव पडत आहेत, कंपन्यांमधील कामगार त्यांचे टार्गेट अचिव्ह करत आहेत. ऑर्डर प्रमाणे प्रोडक्शन देत आहेत, मग तुम्ही नेहमी मागेच का राहाता? तुमची कृपा नेमकी अडकते कुठे? BSNL सारखी कंपनी कर्मचाऱ्यांनी कशी डुबवली? कारण काय? कोर्टात केसचे निकाल २०/३० वर्षे का लागत नाहीत? निकाल लागल्यानंतर त्याची अंमलबजावणी व्हायला परत १०/१५ वर्षे का लागतात? फालतु पोष्ट लिहून, व्हिडिओ बनवून इमोशनली ब्लॅकमेल करु नका. तुम्ही करता ते तुमचे काम आहे, उपकार नाही.तुम्हाला हक्क कळतात तशी कर्तव्ये का कळत नाहीत? आणी कळणार तरी कधी?

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला