नाट्यमय घडामोडीनंतर पसरणी गावच्या उपसरपंच पदी श्री बद्रीनाथ महांगडे

पसरणी गावच्या राजकारणात नव्या शिलेदारांची खेळी

पसरणी : मागील काही दिवसांपासून पसरणी गावच्या उपसरपंच पदाची प्रक्रिया सुरू झाली होती भैरवनाथ विकास पॅनलकडे ११ सदस्य असल्यामुळे उपसरपंच हा त्यांचाच होणार यात काही शंकाच न्हवती. मात्र यंदा तो मान कोणाला याकडे सर्वांचे लक्ष होते. हळू हळू प्रक्रिया पुढे सुरू झाली मावळते उपसरपंच विशाल शिर्के व गावातील भैरवनाथ विकास पॅनलच्या काही ज्येष्ठ मंडळी यांच्यात काही अलबेल नसल्याचे अनेकांना आढळून आले होते. भैरवनाथ विकास पॅनल हा गावातील भाजप व राष्ट्रवादी या पक्षातील नेत्यांनी मिळून बनवलेला पॅनल मागील ३ वर्षात एकदा भाजप एकदा राष्ट्रवादी अशी दोघांना उपसरपंच पदासाठी संधी मिळाली होती मात्र अंतर्गत राष्ट्रवादीतील सदस्यांची होणारी घुसमट व त्यातून निर्माण झालेला उठाव याने आज पसरणी गावातील राजकारणाला एक वेगळेच वळण निर्माण करून दिले.
पक्षातील तडजोडी करणाऱ्या सर्व नेत्यांना घरचा आहेर देत थेट बंडाचे स्वरूप देत आज या सदस्यांनी श्री बद्रीनाथ प्रदीपकुमार महांगडे यांना उपसरपंचपदी विराजमान केले व एक नवा अध्याय पसरणी गावात निर्माण केला.
श्री बद्रीनाथ प्रदीपकुमार महांगडे हे टोकाचे ईच्छुक असल्याच्या माहिती अंतर्गत झालेल्या अनेक बैठकांमध्ये उर्वरित सदस्य यांच्या कडून देण्यात येत होती मात्र बद्रीनाथ हे राष्ट्रवादीचे सदस्य असल्यामुळे त्यांना विरोध होत होता व शेवटच्या क्षणी श्री राहुल गायकवाड यांचा फॉर्म भैरवनाथ विकास पॅनल कडून भरण्यात आला त्याला विरोध करत बंडाची भूमिका श्री विशाल शिर्के, श्री गेणू हेरकळ, श्री आनंद येवले, सौ रुपाली शिर्के, सौ शारदा महांगडे यांनी घेतली मात्र आपल्याकडे बलाबल कमी आहे याची पूर्ण जाणीव त्यांना होती शेवटच्या क्षणी श्री स्वप्निल गायकवाड यांच्या एन्ट्री मुळे व त्यांच्या सोबत असणाऱ्या पसरणी गावच्या सरपंच सौ हेमलता अशोकराव गायकवाड व सदस्य सौ पूजा पवार यांच्या सहकार्याने हे सर्व वातावरण बदलले व बद्रीनाथ महांगडे यांना ही लढाई सोपी झाली. भैरवनाथ विकास पॅनलच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांना आपला पराजय दिसून आला व त्यामुळे त्यांना शेवटच्या क्षणी श्री राहुल गायकवाड यांचा फॉर्म मागे घेतला व नामुष्की टाळली आणि त्यामुळे श्री बद्रीनाथ महांगडे यांचा उपसरपंच पदाचा मार्ग सोपा झाला.
ही निवड प्रक्रिया श्री धर्माजी शिर्के, श्री संपत महांगडे, श्री गणेश महांगडे,श्री शिवाजी येवले,श्री अमोल आबा महांगडे, डॉ मंगेश महांगडे, श्री बाबु नाना शिर्के, श्री गौरव महांगडे, श्री यादव आबा महागडे, श्री चंद्रकांत महांगडे, श्री सूर्यकांत महांगडे, श्री सागर महांगडे, श्री उत्तमनाना महांगडे, श्री साहेबराव शिर्के, श्री राजाराम मुळीक, श्री संतोष येवले, श्री सुनील पांचाळ, श्री ज्ञानेश्वर येवले यांचे योगदान मोलाचे ठरले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला