माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी : वसंतराव मानकुमरे

योग्य वेळी त्यांची अंडी-पिली बाहेर काढणार मानकुमरेंचा इशारा

जावळी  : जावळी तालुक्यात कुठलाही मोठा प्रकल्प नसल्याने येथील स्थानिक शेतकरी पिढ्यानपिढ्या बोजा वाहत आहेत. माथाडी कामगारांच्या बाबतीत दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांचे मोठे योगदान आहे. आता माथाडीचे नेते म्हणणाऱ्यांनी काय काय भानगडी केल्या आहेत त्यांची सर्व अंडीपिली मलाच माहित आहेत. योग्य वेळ येताच ती बाहेर काढणार आहे, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिला. 

वसंतगड येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जि.प.माजी उपाध्यक्ष  वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक  ज्ञानेश्वर रांजणे,  सुनील काटकर,  सौरभ शिंदे,  जयदीप शिंदे,  सयाजीराव शिंदे,  शिवाजीराव मर्ढेकर,  लक्ष्मणराव कडव, एकनाथ ओंबळे, पांडुरंग जवळ, गीताताई लोखंडे, कविता धनावडे, निर्मलाताई दुधाणे, कांतीबाई देशमुख, दत्ता पवार, रवी परामणे, अंकुश शिवणकर, तानाजीराव शिर्के, विनोद वेदे, अविनाश कारंजकर, अशोक भोसले, वीरेंद्र शिंदे, संदीप परामणे, समाधान पोकळे, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, दादा पाटील, बाळासाहेब पाटील-सरपंच आनेवाडी, नाना पवार, विठ्ठल मोरे-संचालक प्रतापगड कारखाना, रामभाऊ शेलार, तुकाराम धनवडे, सागर धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते. 


मानकुमरे म्हणाले, जावळी तालुक्यातील माथाडी कामगार दिशाहिन आहेत.मी लोकसभा निवडणुकीला उभा होतो त्या वेळेला शशिकांत शिंदे यांनी माझ्या विरोधात प्रचार केला. त्यावेळी माझ्यासाठी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी बामनोली, पाचगणी येथे जाहीर सभा घेतल्या होत्या, हे मी विसरलो नाही. उदयनराजेंचा या निवडणुकीत आम्ही सर्वजण ताकदीने प्रचार करणार आहोत.
ज्ञानेश्वर रांजणे म्हणाले, नुकत्याच झालेल्या विरोधकांच्या मेळाव्याला किती लोक उपस्थित होते हे सर्वांना माहीत आहे. जावळीचे कार्य कुशल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे जावळीच्या विकासासाठी झटत आहेत. आता दहा वर्ष जावळीकडे दुर्लक्ष करणारे मते मागायला यायल लागले आहेत. विरोधी उमेदवाराचा पत्ता कोरेगाव तालुक्यात आहे. ते स्थानिक असल्याचा खोटा कळवळा आणत असून उदयनराजेंना जावळी तालुक्यातून 70 हजारापेक्षा जास्त लीड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त