आज 20 ऑगस्ट जाणुन घ्या आजचे राशिभविष्य व शुभ अशुभ मुहूर्त

आजचा शुभ मुहूर्त २० ऑगस्ट २०२२ : अभिजित मुहूर्त दुपारी ११ वाजून ५८ मिनिट ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून ३५ मिनिट ते ०३ वाजून २७ मिनिटांपर्यंत. निशीथ काल मध्यरात्री १२ वाजून ०३ मिनिट ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०६ वाजून ४३ मिनिट ते ०७ वाजून ०७ मिनिटांपर्यंत. त्यानंतर सकाळी ०६ वाजून ४५ मिनिट ते ०७ वाजून ३७ मिनिटांपर्यंत.

शनिवार, २० ऑगस्ट २०२२ { आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

 

मेष : आज कुटुंबीयांसमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेणे आज आवश्यक राहील. कुटुंबीयांच्या मताचा, इच्छांचा आदर करा.

वृषभ :आज जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य मिळेल. व्यावसायिक, व्यवहारी यशाची प्राप्ती होईल. त्यामुळे आजचा दिवस उत्साह, आनंद, प्रसन्नता यांनी परिपूर्ण जाईल.

मिथुन : आज शारीरिक, मानसिक अस्थिरता भासेल. त्यामुळे काळजी घ्या. डोके शांत व मन स्थिर ठेवा. कोणतेही धाडस करण्यास जाऊ नका. अन्यथा नंतर पश्चाताप, मनस्ताप होईल.

कर्क : इतके दिवस घेत असलेल्या मेहनतीचे, परिश्रमाचे शुभ फलित आज आपणास प्राप्त होईल. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा- आकांक्षांची आज प्राप्ती होईल.

सिंह : आजच्या दिवशी काम करताना एका नवीन उत्साहाचा अनुभव घ्याल. आपले काम अधिक चोखपणे, प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

कन्या : आजचा दिवस आपणासाठी उत्तम असेल. भाग्याची, नशिबाची साथ आज लाभेल. त्यामुळे अत्यंत सुखावून जाल. आपल्या आनंदात इतरांना सहभागी करुन घ्याल.

तुळ : आज नको त्या कामात वेळ वाया घालवू नका. आपले लक्ष व चित्त विचलित होऊ देऊ नका. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. प्रकृतीची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्या.

वृश्चिक : आज सुखी, आनंदी सहजीवनाचा आस्वाद घ्याल. जोडीदाराची उत्तम साथ व सहकार्य लाभेल. व्यापार-व्यवसायात काही नवीन संधी निर्माण होतील.

धनु : आज काही अप्रिय घटना व प्रसंग यांना सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे तशी मानसिक तयारी ठेवा. प्रकृतीच्या काही चिंता भेडसावतील. कोणाचे सहकार्य मिळणार नाही.

मकर : आज आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव द्याल. काही मनोरंजनात्मक गोष्टी करण्यात वेळ जाईल. काही महत्त्वाची कामे हातावेगळी कराल.

कुंभ : आज शक्य होतील तेवढेच कामे हातात घ्या, नाही तर कामाच्या व्यापाने दमछाक होईल. जे काम ठरवले आहे तेच पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. नाहीतर वेळ व्यर्थ जाईल.

मीन :आज व्यवसायवृद्धीचा विचार करून व्यापार-व्यवसायात काही धाडसी निर्णय घ्याल. त्यात ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन अवश्य घ्या. भावंडांचे सहकार्य लाभेल.

आजचा अशुभ मुहूर्त २० ऑगस्ट २०२२ : राहूकाळ सकाळी ०९ ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत. दुपारी ०१ वाजून ३० मिनिट ते ०३ वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड असेल. सकाळी ०६ ते ०७ वाजून ३० मिनिटांपर्यंत गुलिक काळ असेल. दुर्मुहूर्त काळ सकाळी ०५ वाजून ५३ मिनिट ते ०६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. त्यानंतर सकाळी ०६ वाजून ४५ मिनिट ते ०७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत.

 

सौ . कांचन थिटे ज्योतिष, अंक वास्तू शास्त्र प्रवीण, विवाह (M.S), वास्तू तज्ञ *एकदा नक्की मार्गदर्शन घ्या* *ऑनलाईन मार्गदर्शन उपलब्ध* संपर्क : *9657836393* तडवळे रोड, नवीन S.T. स्टँड जवळ, कोरेगाव, सातारा

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त