कचरा डेपोमुळे होणारे प्रदुषण योग्य वेळीच रोखणे गरजेचे
गावाच्या विकासासाठी गावांच्या समस्या सोडविण्यासाठी तरुण वर्ग आला एकत्रSatara News Team
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
- बातमी शेयर करा
फलटण, :-
हनुमान मंदिर सस्तेवाडी येथे पार पडलेल्या मीटिंग मध्ये खूप साऱ्या तरुण वर्ग व ग्रामस्थांचा गावांच्या विकासासाठी जबाबदार नागरिक म्हणून सहभाग नाविन्याजोगा होता. त्यामध्ये कचरा निवर्णासंदर्भात बर्याच मुद्दयावर चर्चा झाली असून फलटण नगरपालिका कचरा डेपो व्यतिरिक्त मोकळ्या जागेत टाकला जाणारा पूर्ण कचरा बंद करण्यात यावा तसेच सोमवार पेठ ते बाणगंगा नदी पर्यंत स्ट्रीट लाईट बसविणे जेणेकरून रात्री प्रवास करताना वाहनचालकांना वाहन चालवताना कसलाही अडथळा निर्माण होणार नाही यांची खबरदारी घेणे आवश्यक असुन कचरा डेपोवर २४ तास सुरक्षा गार्ड ची नेमणूक करावी जेणेकरून आसपासच्या परिसरातील ग्रामपंचायत किंवा अनोळखी व्यक्ती मृत जनावरे, गाडी कचरा रस्त्यावर टाकणार नाही याबरोबरच कचरा डेपोच्या चारही बाजूंनी CCTV कॅमेरे बसविण्यात आला तर कचरा कोणीही पेटवणार नाही आणि होणारे प्रदुषण आपल्याला थांबवता येईलच कचरा डेपो शेजारीच संपूर्ण फलटण शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव असल्यामुळे पाणी दुषित होते हे प्रदुषण योग्यवेळिच रोखता यावे यासाठी कचरा डेपोच्या चारही बाजुला झाडे लावून त्याझाडांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. कचरा डेपो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चाऱ्या नदीपर्यंत खोदून त्या वेळोवेळी साफ ठेवण्यात यावी अशी मागणी सस्तेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आली असून गावाची समस्या सोडविण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी एकत्र येण्याचा संकल्प यावेळी केला गेला तसेच वेळ पडली तर आंदोलन सुध्दा उभे करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
सदर बैठक नुकतीच गावातील हनुमान मंदिरात पार पडली या बैठकीला ग्रामस्थ तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

स्थानिक बातम्या
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 27th Dec 2022 12:35 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 27th Dec 2022 12:35 pm













