छ.शाहु महाराज यांचा राजधानीत पूर्णाकृती पुतळा उभारला जाईल : छ.खा.उदयनराजे भोसले

सातारा : २१ व्या शतकात प्रगती होत आहे.मात्र, महापुरुष यांच्या बद्दल अपशब्द बोलले जात आहे. त्यामुळे पक्ष,जात आदींमध्ये भेद निर्माण होत आहेत.तेव्हा त्यांचे विचारांचा जागर पसरविण्यासाठी ठिकठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत.शिवाय,छ.शाहु महाराजानी साताऱ्यात केलेल्या कार्याची दखल घेऊन शहरात पूर्णाकृती भव्य दिव्य असा पुतळा उभारला जाईल.असे आश्वासन श्रीमंत छ.खा.उदयनराजे भोसले यांनी दिले.
   सातारा नगरीचे संस्थापक छ. शाहु महाराज यांचा स्मृतिदिन येथील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये संपन्न झाला.तेव्हा छ.खा.भोसले मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले,"थोरांनी दिलेल्या विचारावरच लोकशाही टिकली आहे.त्यांनी दिलेल्या  विशालदृष्टीकोणातूनच सर्वधर्मसमभाव राखला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी दिलेल्या सर्वधर्मसमभाव ही संकल्पना रुजविण्यासाठी सर्वानी एक होणे गरजेचे आहे.असाही पुनरुच्चार करीत त्यांनी विरोधी विचारधारेवर चौफेर टीका केली. कोण्हीही स्वार्थ न पाहता प्रत्येक कुटुंबाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल.हेही प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पाहिले पाहिजे.
    प्रमुख संयोजक इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी प्रास्ताविकपर माहिती कथन केली.यावेळी डॉ.धनाजी मासाळ व आदिनाथ बिराजे यांनीही मनोगत व्यक्त केली.सदरच्या कार्यक्रमास रणजित देशमुख,राजेंद्र शेलार,डॉ.सुरेश जाधव,नरेंद्र पवार,कॉ.किरण माने,सुनील काटकर,प्रा.दशरथ सगरे,अमर गायकवाड,ऍड.दत्ता बनकर,सौ.सुजाताराजे महाडिक,सादिक शेख,चंदुशेठ जाधव,अरबाज शेख,जोतिराम वाघ,सुनील भोसले,उमेश चव्हाण,भूषण पाटील,विक्रम कदम,प्रवीण धस्के,शिरीष चिटणीस आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार व कार्यकर्ते उपस्थित होते. याकामी, महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकादमी,गिरी प्रेमी ग्रुप व राष्ट्रसेवा समुह यांनी संयोजन केले.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त