"भाऊ, नौटंकी छान जमतीय तुम्हानी!.... शेतकर्‍यांची वारी काढणाऱ्या सदाभाऊ खोतांवर शेतकऱ्यांमधूनच होतेय टीका

सातारा   : 'लेकरू रडल्याबिगर आई त्याला दूध पाजत नाय..' बरोबर हायं, सदाभाऊ तुमचं हे म्हणणं आम्हानी एकदम पटलं  फकस्त शंका एकच हायं, तुम्ही शेतकऱ्यांचं नेतं म्हणून मंत्री झालतां तवा तुमचं हे रडणारं लेकरू पाच वर्स कसं शांत बसलं हुतं? सरकार आमचं असलं तरी रडल्याबिगर शेतकऱ्यांना काय बी मिळणार नायं असं तुम्ही आता म्हणतायं, मग मंत्री असताना रडायचं इसरून तुम्ही चांगलं हसत हुता की राव.  शेतकऱ्यांचं लयं प्रश्न हायती, आमचं फडणवीस सायब समदं प्रश्न सोडवतील असं सांगताय तर  मग शेतकऱ्यांच्या नावावर उन्हातान्हात पायी वारी काढून जीवाचं हाल करण्यापरीस भिडा डायरेकट. उगाच कशाला लेकरास्नी रडायला लावतायं? बघा काय ते.. पण भाऊ नौटंकी छान जमतीय तुम्हानी! 
  शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि प्रश्न घेऊन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी कराड येथून शेतकऱ्यांची वारी नावाचं एक प्रकारचं आंदोलन सुरू केले आहे. या वारीत सदाभाऊंनी कार्यकर्त्यांसह साताऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस हा एकमेव नेता राज्यात असून तोच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तुम्ही सरकार मध्ये होतात आता ही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत तर मग शेतकऱ्यांची वारी कशासाठी, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना सदाभाऊ म्हणाले लेकरू रडल्याबिगर आई त्याला दूध पाजत नाय. हे सरकार केवळ चर्चा करण्यात व्यस्त आहे तर विरोधक फक्त नावालाच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मागण्या आम्ही या सरकारपर्यंत वारीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे शेवटी सदाभाऊंनी स्पष्ट केले. एकीकडे सदाभाऊंच्या या आंदोलनाला समाजातून संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी शेतकरी वर्गातून मात्र सदाभाऊंवर टीका होताना ऐकायला मिळत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त