वडूज येथील इंदिरानगर मधील पाण्याच्या टाकीने 'शोले' ची आठवण

त्या टाकीतील पाणी चार वर्षे होऊनही हाकेच्या अंतरावरील दलित वस्तीत पोहोचलेच नाही

सातारा न्यूज वडुज : अजित जगताप / :चार वर्षांपूर्वी खटाव तालुक्यातील वडूज नगरीत सुमारे छत्तीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. परंतु, त्या टाकीतील पाणी चार वर्षे होऊनही हाकेच्या अंतरावरील दलित वस्तीत पोहोचलेच नाही. त्यामुळे या टाकीकडे पाहून अनेकांना 'शोले' हिंदी चित्रपटातील पाण्याच्या टाकीची आठवण होत आहे.

                         याबाबत माहिती अशी की, वडूज ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायत मध्ये झाले. त्याच वेळी अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेतून  १ कोटी ४७ लाख ५२हजार २८३ रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली.यामध्ये २० कामांचा समावेश करण्यात आला होता.सदरची काही कामे पूर्ण सुध्दा झाली आहेत .

     इंदिरा नगर पिण्याच्या पाण्याची टाकी समवेत गटर व रस्ता डांबरीकरण मेनपाईप लाईन, रस्ता काँक्रीटीकरण, आर सी सी गटर बांधणे, जलवितरण व्यवस्था करणे आदि काही कामे पूर्ण झाली आहेत. पण, गेली चार वर्षांपासून काही प्रमाणात पाणी पुरवठा यंत्रणा पूर्ण होऊ शकली नाही.निळ्या पाईप रस्त्यालगत दिसत होत्या. आता पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम झाल्याने निळ्या पाईप नुसत्याच लटकत आहेत. तर काही पाईप तुटून पडल्या असून भविष्यात रस्त्याची खोदाई करून काहींना जलवितरण व्यवस्था कार्यन्वित करावी लागणार आहे. असे चित्र दिसत आहे.

     सदर पिण्याच्या पाण्याची टाकी२०१७-१८ साली बांधून पूर्ण झाली आहे तर २०१८-१९ साली जलवितरण होण्यासाठी इंदिरा नगर पाण्याची टाकी ते  आदिनाथ नगर ते मातंग वस्ती मेन पाईपलाईन कामे झाली आहेत.येथील स्थानिक रहिवासी व रिपाइं सातारा जिल्हा उपाध्यक्ष अजित नलावडे यांनी याबाबत वडूज नगर पंचायतीशी लेखी पत्रव्यवहार केला होता. पण, अध्याप काही घरात या टाकीचे पाणी पोहचू शकले नाही. 'शोले' चित्रपटात रामगड गावात पाण्याची टाकी दाखवली आहे. त्यावर चढून नायक धर्मेंद्र( बिरु)  आंदोलन करीत असल्याचे चित्रीकरण आहे.पण, रामगड गावात वीज पुरवठा नसल्याने या टाकीत पाणी कसे चढणार? याचा नेमका शोले चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांना विसर पडला होता. तशी अवस्था वडूज मध्ये गेली चार वर्षे पाहण्यास मिळत आहे. 

              सध्या विकास कामांबाबत चांगलीच स्पर्धा होत असली तरी त्याचा फायदा होत आहे की नाही? याची सखोल चौकशी करण्यासाठी एखाद्या तज्ञांची समिती नेमण्याची वेळ आली आहे. असे सध्या तरी स्पष्टपणे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. रस्ता आधी की पाण्याची पाईप?हे कोडे सोडविण्यासाठी पुन्हा रस्त्याची खोदाई होऊ नये एवढीच माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, याबाबत नगर पंचायत कार्यालयाशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे याबाबत नेमकी सत्य परिस्थिती समजू शकली नाही..

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला