कास पुष्प पठारावरील औषधी वनस्पतींचा वापर जगासाठी व्हावा...... केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक

कास : जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील औषधी वनस्पतींचा वापर जगासाठी व्हावा असे मत गोवा लोकसभेचे खासदार तसेच केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. कास पुष्प पठार भेट दिल्यानंतर आपले मत व्यक्त केले. नाईक यांनी कास पुष्प पठार परिसरातील जैवविविधतेची तसेच वेगवेगळ्या फुलांची माहिती जाणून घेतली. कास पुष्प पठाराचे संरक्षण व संवर्धन हे कास पठार कार्यकारी समितीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे सुरू असल्याची भावना त्यांनी यावेळीव्यक्त केली. युनेस्कोने या संपूर्ण पठार परिसराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या फुलांच्या प्रजातींना अधिक महत्त्व प्राप्त झाले असून पठार परिसरामध्ये ज्या काही औषधी वनस्पती आहेत.कासच वैभव पाहून मला खूप समाधान वाटल. या परिसरातील वनस्पतीचे औषध म्हणून संशोधन व्हावे यासाठी प्रयत्न करु.कास पुष्प पठार हे भारत मातेचे वैभव असून हे वैभव जगाला दाखवण्याची संधी मिळाली असून यावर राज्य सरकार तसेच केंद्र सरकार नक्कीच विचार करेल. आसेही मत त्यांनी व्यक्त केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला