नव उद्योजिका यांचं स्वागत आणि सन्मान सोहळा संपन्न

शिवथर : जिजाऊंच्या लेकी संस्थे अंतर्गत नव उद्योजिकांचा स्वागत आणी सन्मान सोहळा सोबतच   डिजिटल  मार्केटिंग सेमिनार .
हा कार्यक्रम रविवार दिनांक 28 रोजीelite हॉटेल वाढे फाटा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  प्रगती ऍग्रो  फूड्सच्या सौ कांचन कुचेकर या होत्या.
श्री सत्यजित गुजर हे डिजिटल मार्केटिंग ची माहिती देण्यासाठी आले होते. सक्सेस अबॅकस च्या वतीने श्री सूर्यकांत धनवडे सर यांनी अबेकसच्या फ्रेंचायसी ची माहिती दिली. पदवीधर महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून दिले. खुशी फार्मच्या डॉ. सौ सविता वावरे मॅडम यांनी बिजनेस कौन्सिलिंगचा सेमिनार अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने घेतला.त्यासाबतच सई फाउंडेशनच्या संचालिका सौ अनिता भोसले यांनी त्यांच्या संस्थेमार्फत जिजाऊंच्या लेकी संस्थेतील महिलांना एक सेमिनार फ्री देण्याच्या दिले.कर्म प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ अर्चना देशमुख याही उपस्थित होत्या. त्याचबरोबर उद्योजिका सक्सेस स्टोरी युनिक फॅशनच्या श्रुती चव्हाण यांचे मोलाचे  मार्गदर्शन महिलांना मिळाले. आपल्या साताऱ्याचे नाव अंतर राष्ट्रीय पातळीवर उंचवणाऱ्याा श्री प्रसाद अवघडे यांचा सत्कार जिजाऊंच्या लेकी संस्थेमार्फत केला करण्यात आला त्यांनी भूतान येथे झालेल्या कराटे या खेळामध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले होते.त्याचबरोबर त्यांचे सेन्साई श्री निखिल सोनकटाळे आणि सीकेसी सातारा जनरल सेक्रेटरी सौ. निकिता गायकवाड यांनी महिला चे सुरक्षिताचे माहिती दिली. चि. मयंक फाळके यांनी शिवगर्जना करून कार्यक्रमची सुरुवात केली  श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या हार घालून दीप प्रज्वलन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.  गिता पाटील यांनी लाटकर       सातारी  कंदी पेढा देऊन सर्व नव उद्योजकांचे स्वागत केले. We story Tellers Founder श्री सत्यजित गुजर यांनी डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय याची सविस्तर माहिती महिलांना दिली. ज्या महिला घरगुती व्यवसाय करतात त्यांना एक व्यासपीठ देण्याची एक धडपड आणि जिद्द ठेवून हा कार्यक्रम करण्यात आला होता. व्यवसायिक महिला  खूप आहेत पण त्यांना एक मार्केट उपलब्ध करून द्यावे किंवा त्यांनी केलेल्या कामाला एक शाब्बासकीची थाप मिळावी हा या सोहळ्या मागचा मुख्य हेतू होता.  यामध्ये नव उद्योजकांनी त्यांच्या मालाचे सॅम्पल आणले होते त्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रम खूप छान झाला.  नव उद्योजिका चे स्वागत आणी सन्मान करण्यात आला  सौ. अर्पिता जामदार , कु. गायत्री फुटाणे, सौ सुजाता पवार, सौ मयुरी जगदाळे, कु. शिवानी  डेरे, सौ सुनीता कुकडे, सौ निकिता शहा, अफशा देवांनी, सौ रेखा निंबाळकर, सौ आरती रजपूत, कु स्नेहल जाधव, सौ संजना वाघ, सौ सुषमा लावंड, सौ रत्नमाला भुजबळ, सौ ज्योती पाटील, सौ संध्या घनवट, सौ अश्विनी फुटाणे, सौ सविता वावरे, सौ पुनम गुरव, सौ स्मिता ताटे पाटील, सौ सुषमा हिंगमिरे, सौ शुभांगी जाधव, कु ज्योती वडके, सौ प्रियंका बारटक्के, सौ पद्मा सावंत, कुमारी नीलम माने, कुमारी पूजा पवार, श्रीमती आरती बनसोडे, गीता पाटील, सौ स्वाती शेडगे, सौ पूजा मदने, सौ भाग्यश्री पाटुकले,  सौ शिवानी खर्शिकर, सौ अनिता शिंदे, सौ शेफली कुंभार, सौ सोनाली निकम, सौ अनया निकम,सौ   राजश्री कापले, सौ सुलक्षणा पाटुकले,  सौ सुनीता सणस, सौ स्मिता जमदाडे, सौ सोनाली मंगरूळे आणी सौ त्रिवेणी थोरात यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अँकरिंग कु. सानिका जाधव यांनी केले तसेच छायाचित्रण श्री शुभम साळुंखे यांनी केले. यामध्ये मोलाची साथ श्री देवेंद्र जाधव यांची मिळाली. अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका सौ सुप्रिया फाळके यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला