शिवतीर्थाला बाळासाहेब देसाई चौक नाव देण्याचे वृत्त चुकीचे... जयवंत शेलार शिवसेना जिल्हाप्रमुख

सातारा :  सातारा शहरातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर लोकनेते बाळासाहेब देसाई चौक असे नामकरण करण्याबाबत सातारा शहरातील समाज माध्यम आणि वृत्तपत्रात प्रसारित झालेल्या बातम्या ह्या पूर्णतः चुकीच्या आणि विपर्यास करून प्रसारित झालेल्या आहेत असे श्री. शेलार, शिवसेना जिल्हा प्रमुख, सातारा यांनी कळविले आहे.
सातारा शहरातील शिवतीर्थ हे सातारकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असून याबाबत संपूर्ण सातारकरांच्या आदराच्या भावना आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ स्मारकात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने चौक तयार करणे असे कोणतेही काम प्रस्तावित नाही. जिल्हाधिकारी सातारा यांना पालकमंत्री महोदयांच्या कार्यालयाने कळविलेल्या पत्रामध्ये पोवईनाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने नवीन आयलँड तयार करण्याबाबत बैठक आयोजित करणे विषयी नमूद केले आहे. सदर बैठकीमध्ये पोवईनाका परिसरात शिवतीर्थ स्मारक सोडून इतर ठिकाणी आयलँड तयार करण्यासाठीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शिवतीर्थाला लोकनेते बाळासाहेब देसाई चौक असे नामकरण करण्याबाबतचा कोणताही विचार अथवा प्रस्ताव प्रस्तावित नाही. शिवतीर्थ हा परिसर वगळता पोवई नाक्याचा इतर परिसर हा खूप मोठा व विस्तृत आहे. त्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारक रुपी आयलँड विकसित करण्यात येणार आहे. या करिता आढावा बैठक लावणे बाबतची सूचना जिल्हाधिकारी, सातारा यांना दिलेली आहे.
पोवई नाक्यावरील शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारे लोकनेते बाळासाहेब देसाई चौक असे नामकरण करणेचा कोणताही विचार नाही. त्यामुळे समाज माध्यम व वृत्तपत्रात विपर्यास लावून प्रसारित झालेल्या बातम्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
जयवंत शेलार

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त