साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांची आढावा बैठक संपन्न

सातारा  : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरभी मंगल कार्यालयात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
   यावेळी जिल्ह्यातील संपूर्ण आढावा स्वतः ऍड.आंबेडकरांनी घेतला. गण, गट,तालुका व जिल्हा कार्यकारिणीची हजेरीही स्वतः त्यांनीच घेऊन अनुपस्थितीबद्धल विचारणा करण्यात आली.प्रत्यक्ष संबंधित पदाधिकारी यांना पुढे घेऊन विचारणा करण्यात आली. लवकरच वरिष्ठांकडे अभ्यासपूर्ण अहवाल पाठविण्याबाबत सूचना देण्यात आल्या.यावेळी जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकारिणी, महिला आघाडी, युवा आघाडी, कामगार कर्मचारी युनियन आदी सर्व विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई व भीमराव घोरपडे यांनी स्वागत केले.याकामी,जिल्हा महासचिव शरद गाडे व गणेश भिसे,उपाध्यक्ष संदीप कांबळे, संजय कर्पे, नगरसेवक तुषार बैले, कांबळे आदींनी अथक असे परिश्रम घेतले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष व्ही.आर.थोरवडे, महासचिव विद्याधर गायकवाड, भागवत भोसले,विजय गायकवाड, तालुकाध्यक्ष आबा दणाने (सातारा), अनिल कांबळे (कोरेगाव) व मिलिंद कांबळे (पाटण),पी.डी. साबळे, सिद्धार्थ मडके,वंचितचे तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव (महाबळेश्वर), बाळासाहेब जगताप(पाटण), प्रकाश सपकाळ(जावली) आदी पदाधिकारी व त्यांचे सहकारी, सनी तुपे,योगेश कांबळे, राजाराम कदम,संजय कदम,उत्तम कांबळे, सुरेश कांबळे,आनंदा गुजर, वैभव कदम,नितीन कदम,सचिन कदम, राजेंद्र शिंदे,चित्राताई गायकवाड, सायली भोसले व त्यांच्या कार्यकर्त्या सहकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, महासभेचे कार्यकर्ते, समता सैनिक दल सैनिक व ऍड. आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला