अंगापूर यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम..
Satara News Team
- Mon 13th Mar 2023 10:01 am
- बातमी शेयर करा
देशमुखनगर ः सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन येथील ग्रामदैवत श्री.एवार्जीनाथ यात्रा मंगळवार दि.१४ व बुधवार दि.१५ मार्च रोजी संपन्न होत आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.१३ रोजी संध्याकाळी हरीजागर संपन्न होणार आहे.दि.१४ रोजी सकाळी ९.०० वाजले पासून भव्य बैलगाडा शर्यती आयोजित केल्या आहेत. सायंकाळी ७.३० वाजता ग्रामदैवत श्री.एवार्जीनाथ छबिनास ( मिरवणूक)सुरूवात होणार आहे. बुधवार दि.१५ रोजी दुपारी ४.०० वाजता भव्य जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानात महाराष्ट्रातील नामवंत कुस्ती मल्लांच्या लढती जोडण्यात आल्या आहेत. तर रूपये १०० ते १००० इनामाच्या कुस्त्या मैदानात जोडण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र कणसे, सरपंच नीलम कणसे,उपसरपंच विश्वनाथ कणसे यांच्या वतीने देण्यात आली आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहवे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 13th Mar 2023 10:01 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 13th Mar 2023 10:01 am
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Mon 13th Mar 2023 10:01 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 13th Mar 2023 10:01 am
संबंधित बातम्या
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Mon 13th Mar 2023 10:01 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Mon 13th Mar 2023 10:01 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 13th Mar 2023 10:01 am
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Mon 13th Mar 2023 10:01 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Mon 13th Mar 2023 10:01 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 13th Mar 2023 10:01 am










