पोलीस अधीक्षक समीर शेख यांची हुतात्मा सैनिकांच्या आई वडिलां बरोबर दिवाळी
प्रकाश शिंदे - Tue 25th Oct 2022 01:39 pm
- बातमी शेयर करा
वाई:साताऱ्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हुतात्मा पोलीस अधिकाऱ्याच्या नातीवाईकांसोबत आपली दिवाळी साजरी केली
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून दिवाळीतच समीर शेख यांनी पदभार स्वीकारला. ते गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक होते. शेख यांनी यापूर्वी साताऱ्यात काम केलेले असल्याने व त्यांच्या कामाची ओळख असल्याने सातारकरांनी त्यांच्या नियुक्तीचे उत्साहात स्वागत केले आहे. त्यांनी गडचिरोली येथील लाहेरी पोलीस ठाण्यात ८ ऑक्टोबर२००९ रोजी नक्षलवाद्यांशी लढताना केलेल्या बॉम्बस्फोटात हुतात्मा झालेले धोम ( ता वाई) येथील चंद्रशेखर देशमुख या पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांसोबत आपली दिवाळी साजरी केली. चंद्रशेखर देशमुख यांचे आई-वडील धोम येथे राहतात आपली शेती करतात . समीर शेख हे गडचिरोली येथे अधिकारी होते आणि ते आता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक झाले आहे.गडचिरोली येथून सातारा आणि आता धोमला सपत्नीक घरी आल्याने हुतात्मा चंद्रशेखर देशमुख यांचे वडील संजय आणि आई सोयरा यांना खूप आनंद झाला. त्यांनी दुखावेग बाजूला ठेवून त्यांनी शेख यांचे स्वागत केले. समीर शेख यांनी सपत्नीक देशमुख यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. किमान दीड तास त्यांच्यासोबत गप्पांमध्ये व्यतीत केला.दिवाळी भेट दिली. कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करा असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर शेख यांनी वाईच्या गणपती मंदिरात महागणपतीचे दर्शन आणि आरतीही केली.वाई पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांची आस्थेवाईक पणे चौकशी केली, अडचणी जाणून घेतल्या. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, उपनिरीक्षक कृष्णकांत पवार, स्नेहल सोमदे,,सुधीर वाळुंज आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यानंतर समीर शेख यांनी भुईंज पोलीस ठाण्याला भेट दिली.सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पोलीस ठाण्याबाबत माहिती दिली.


साताऱ्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गडचिरोली येथे २००९ मध्ये नक्षलवाद्यांच्या बॉम्बस्फोटात हुतात्मा झालेल्या उपनिरीक्षक चंद्रशेखर देशमुख यांच्या आई वडीलां सोबत सपत्नीक दिवाळी साजरी केली.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 25th Oct 2022 01:39 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 25th Oct 2022 01:39 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 25th Oct 2022 01:39 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 25th Oct 2022 01:39 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 25th Oct 2022 01:39 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 25th Oct 2022 01:39 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Tue 25th Oct 2022 01:39 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Tue 25th Oct 2022 01:39 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 25th Oct 2022 01:39 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 25th Oct 2022 01:39 pm













