महेश शिंदे यांना खटाव मधून मोठा धक्का....विसापूर येथील रिंगी चिंगी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

खटाव  :  विसापूर या. खटाव येथील रिंगी चिंगी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार आ शशिकांत शिंदे यांना मताधिक्याने निवडणूक आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

 तसेच कोरेगाव मतदारसंघातील विरोधकांची दडपशाही संपवून स्वाभिमानाची एकजूट उभी करण्यासाठी आणि मतदारसंघातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्याबरोबरच हक्काचे आ. शशिकांत शिंदे हेच असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

यावेळी युवा नेते सागर भाऊ साळुंखे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे व मान्यवर उपस्थित होते. कोरेगाव मतदार संघामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात शशिकांत शिंदे यांच्याकडे इन्कमिंग चालू आहे. पैसा नाही तर निष्ठा कामाला येत असून सर्वसामान्य कार्यकर्ता हा आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर प्रेम करणारा आहे . 

दमबाजी अरे रावी तसेच अहंकारी आमदाराला कंटाळून विसापूरच्या कार्यकर्त्यांनी शशिकांत शिंदे गटांमध्ये प्रवेश केलेला आहे मेलेला माणूस आगीला भीत नाही आम्ही कोणाच्याही दबावाखाली किंवा दडपणा खाली राहणार नाही आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे असे आमदार शशिकांत शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला