दहिवडी नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल पूर्ण .पुढील नगराध्यक्ष पदाचा दावेदार कोण ?
- धिरेनकुमार भोसले
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असलेल्या तसेच माण तालुक्याची राजधानी असलेल्या दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत असतानाच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नगरसेवकांना नक्की नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. दिनांक 10 रोजी नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत असून विद्यमान नगराध्यक्ष सागर पोळ यांनी अडीच वर्षे नगराध्यक्ष पदाची संधी उपभोगल्यानंतर प्रत्येक नगरसेवकाला नगराध्यक्ष पदाचे वेध लागले आहेत. कलम 60 नुसार नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांची अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. दहिवडी नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरदचंद्रजी पवार गट) सत्ता आहे. राष्ट्रवादीचे आठ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत असलेले चार तसेच भाजपाचे पाच नगरसेवक आहेत. सत्ताधारी किंवा विरोधकांनी एकमेकांच्या जिरवा जिरवीच्या राजकारणात नामंजूर केलेले ठराव याच कारणामुळे दहिवडी नगरपंचायत जिल्ह्याचा केंद्रबिंदू ठरली होती. राज्यातील 105 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची मुदत ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये संपुष्टात येत असून सदर नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष पदाचे सोडत होईपर्यंत ज्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे तेथे महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 च्या कलम 60 नुसार कार्यवाही करण्याचे आदेश शासनाच्या उपसचिवांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सात ऑगस्टला दिले आहेत. कलम 60 मध्ये नमूद केल्याप्रमाणे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुढील नगराध्यक्ष कोण याची उत्सुकता दहिवडीकरांना लागून राहिले आहे.
कलम 60 नक्की आहे तरी काय? अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची पदे एकाच वेळी रिकामी होतात. या काळात नगरपंचायतीचे कामकाज कोण चालवणार हे प्रशासक ठरवतात.
स्थानिक बातम्या
सन 2019 पूर्वीच्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' बंधनकारक
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
केसांबरोबर खिशाला ही लागणार कात्री
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
अजितदादा आणि शरद पवार गटाची कोरेगावात जमली गट्टी
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
सहकार विभागाशी निगडीत सर्व संस्थांचा कारभार पादर्शक असावा - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
करंजे येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ च्या रुग्णवाहिकेचे आमदार घोरपडेंच्या हस्ते लोकार्पण
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
संबंधित बातम्या
-
अजितदादा आणि शरद पवार गटाची कोरेगावात जमली गट्टी
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
-
सहकार विभागाशी निगडीत सर्व संस्थांचा कारभार पादर्शक असावा - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
-
अंगापुरच्या मनमानी उपसरपंचावर अविश्वासचा ठराव
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
-
राज्यातील गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर कायम स्वरुपी भगवा झेंडा उभारावा
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
-
फलटणचे आमदार श्री सचिन पाटील फलटण शहराच्या विकासाच्या ॲक्शन मोडवर
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
-
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
-
मंत्री मकरंद पाटील ठेकेदाराबरोबर पोहचले नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात .
- Thu 8th Aug 2024 09:30 pm
-
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Thu 8th Aug 2024 09:30 pm