सातारा पालिका मुकादमाच्या डोक्यात सफाई कर्मचाऱ्याने घातले फावडे

सातारा : उसने पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात सातारा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने गुरुवार परज येथे मुकादमाच्या डोक्यात फावडे घालून त्यांना गंभीर जखमी केले.  संतोष खुडे (वय ४३, रा. ढोणे कॉलनी, रामाचा गोट) असे जखमी मुकादमाचे नाव असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

याप्रकरणी सतीश मारुती जाधव (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीनुसार गुरुवारी सकाळी साडेसात वाजता खुडे हे गुरुवार परज येथे कामावर हजर राहून सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेत होते. त्यावेळी सतीश जाधव याने तेथे येऊन 'माझे उसने घेतले आहे. साडेसात हजार रुपये परत दे, नाहीतर तुला बघून घेईल,' असा दम दिला. तसेच रागाच्या भरात शिवीगाळ करत दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या हातातील फावडे घेऊन त्यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला. यामध्ये खुडे गंभीर जखमी झाले. 

दोघांच्या झटापटीमध्ये इतर सफाई कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. जाधव रागाच्या भरात शिवीगाळ करत तेथून निघून गेला. खुडे यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यामध्ये जाधव याच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त