दोन जुळ्या मुलींचा जन्म दिल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने मातेचा दुर्दैवी मृत्यू

सातारा : दोन जुळ्या मुलींचा जन्म झाल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्‍हील) दि. १० नोव्‍हेबर रोजी रात्री घडली. जुळ्या मुलींचा जन्‍म झाल्‍यानंतर कुटुंबिय आनंदात असताना अवघ्या काही तासात मातेचा मृत्‍यू झाल्‍याने हळहळ व्‍यक्‍त होत आहे. मुली सुखरुप आहेत. दरम्‍यान, मृत्‍यूचे कारण नेमके कारण समजू शकलेले नाही.भागाबाई पांडुरंग कोकरे (वय ४०, रा. वेळे ढेण, ता. जावळी, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी मातेचे नाव आहे.

 

याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी की, भागाबाई कोकरे या गर्भवीत होत्‍या. यामुळे दि. १० रोजी पहाटे त्‍यांना प्रसूतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्या पतीने दाखल केले होते. भागाबाई कोकरे यांना जुळं असल्‍याने प्रसुती विभागाने त्‍यांची काळजी घेवून उपचाराला सुरुवात केली. साडेसहा वाजता त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. दोन्हीही मुलींची प्रकृती चांगली आहे. प्रसुतीनंतर भागाबाई काेकरे यांनी नाष्टाही केला. दुपारपर्यंत कोकरे कुटुंबिय आनंदात होते. दिवाळी व मुलींचा जन्‍म असा माहोल होता. मात्र, प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी भागाबाई यांना अचानक थंडी वाजून आली. काही वेळानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्‍यानंतर तात्‍काळ उपचाराला सुरुवात करुन त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयातीलच अतिदक्षता विभागात दाखल केले. रात्री सव्वादहा वाजता मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कोकरे कुटुंबियांना याची माहिती मिळाल्‍यानंतर ते हादरुन गेले. रुग्णालयात त्‍यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. जुळ्या मुली आईपासून पोरक्‍या झाल्‍याने हळहळ व्‍यक्‍त झाली. दरम्‍यान, या घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त