शिरवळ जवळ भीषण अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावरील नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे भीषण अपघात झाला. या झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.

 तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.12) घडली असून, शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत याची नोंद झाली आहे.

 घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत कार्यरत तीन तरुण आणि एक तरुणी महाबळेश्वरला फिरण्यासाठी दुचाकीवरून (एमएच ०१ डीजे ८३६५) निघाले होते. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळील नीरा नदी पुलावर भरधाव ट्रकने (पीबी ०६ ए यु ९९९५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रुबेल सिन्हा (वय २४) रस्त्यावर पडली, आणि तिच्या शरीरावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप जगताप, विलास यादव, पो. ह. अरविंद बाराळे, आणि भाऊसाहेब दिघे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

रुबेल सिन्हा हिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरुण वयात गमावलेल्या जीवामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. अपघातामुळे महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता पुन्हा एकदा समोर आली आहे. शिरवळ पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, ट्रक चालकाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

तसेच या दुर्घटनेने महामार्गावरील सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांनी वाहनचालकांना अधिक सावध राहण्याचे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.अपघातानंतर पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांनी जखमींना धीर देण्याचा प्रयत्न केला व परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनाक्रमामुळे महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त