झोपेत घाम येणे धोक्याची घंटा, हृदयविकाराच्या झटक्याचे असू शकते लक्षण

सातारा न्यूज  : हृदयविकाराचा झटका हा एक मूक आजार आहे, जो प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे हृदयासंबंधीत किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. हृदयविकाराच्या झटक्याची 5 लक्षणे सकाळी दिसून येऊ शकतात. वेळीच ते ओळखले तर गंभीर धोका टाळता येणे शक्य आहे.
 
सकाळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. हृदयविकाराच्या झटक्याची बहुतेक लक्षणे झोपेतून उठल्यानंतर लगेच दिसून येतात. एका मेडिकल रिसर्च संशोधनातून असे दिसून आले आहे की, सकाळपासून ते दुपारपर्यंत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 40 टक्के जास्त असतो. कारण झोपेत तुमचे रक्त खूप घट्ट असते. ज्यामुळे हृदयावर दबाव पडून हार्ट अटॅक येण्याचा संभव असतो. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर हृदयविकारासंबंधित दिसून येणारी सुरुवातीची ५ लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नयेत.

डाव्या बाजूला वेदना
डाव्या जबड्यापासून ते डाव्या हातापर्यंतचे संपूर्ण अंग दुखत असेल, तर हे हृदयविकाराच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर डाव्या बाजूला दुखत असल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
 
झोपेत श्वसनाची समस्या उद्भवल्यास
हृदयविकाराच्या झटक्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि गुदमरल्यासारखे वाटू शकते. यामुळे झोपेमध्ये अचानक खंड पडू शकतो किंवा सकाळी उठल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
 
छाती जड होणे
हृदयविकाराच्या झटक्याने छातीत दुखते, जे पाठीपर्यंत जाणवते. या दरम्यान, छातीवर काहीतरी वजन ठेवल्यासारखे जाणवू शकते. अशावेळी झोपेतून उठल्यावर देखील काही वेळ तसेच जाणवत असेल तर, त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा.

मॉर्निंग सिकनेस
सकाळी उठल्यावर काही जणांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो. पण त्यामागे सायलेंट हार्टअटॅकचे देखील कारण असू शकते. हृदयाच्या रक्तवाहिनीत अडथळा आल्यावर रुग्णाला उलट्या किंवा मळमळ झाल्यासारखे वाटते.
 
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी काय करावे?
खराब जीवनशैली आणि आस्वास्थकारक आहाराचे सेवन केल्यामुळे हृदयविकारांसारखे गंभीर आजार उद्भवतात. त्यामुळे योग्य आहार घेतल्यास हृदयासंबंधीत कोणतेही विकार होऊ शकणार नाही.
 
धान्य, शेंगा, भाज्या, ताजी फळे आणि बियाणे यांसारख्या आरोग्यवर्धक पदार्थांचा आहारात समावेश करणे, आणि जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करणे, हेच चांगल्या निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त