मोहिते पाटलांच्या विजयाचे खरे किंगमेकर शेखर गोरे
धीरेनकुमार भोसले
- Wed 5th Jun 2024 03:53 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी : गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच चंग बांधलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख व संचालक शेखर गोरे यांनी सुरुवातीच्या काळापासूनच साम-दाम-दंड-भेद याचा पुरेपूर वापर करत मित्रपक्ष राष्ट्रवादी पेक्षाही जास्त प्रयत्न केल्याचे संपूर्ण माढ्याने पाहिले आहे.
गेल्या लोकसभेला राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीत अन्याय होत असलेले फलटणमधील जाहीर सभेत दस्तर खुद्द शरद पवारांच्या सभेत अन्यायाविरुद्ध शेखर गोरे यांनी दंड थोपटल्याने जाहीर झालेल्या लोकसभेच्या मैदानातून पवारांनी माघार घेतली होती.गेल्या लोकसभेला महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यात शेखर गोरे यांचा मोठा वाटा आहे.
त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर शेखर गोरे बऱ्याच काळ शांत असल्याचे माण तालुक्याने पाहिले होते. परंतु त्यानंतर लोकसभा निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीचे काम करणार नसल्याचे गोरे यांनी जाहीर केले होते. दरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर ,अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची शेखर गोरे यांच्या संपर्क कार्यालयात वर्दळ वाढली होती.
त्यानंतर वडूज येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शेखर गोरे यांनी कार्यकर्ते घेतील तो निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले. नंतर कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर करत जीव ओतून काम केल्याने मोहिते पाटीलच विजय होतील असा विश्वास सुरुवातीपासूनच शेखर गोरे व्यक्त करत होते.
महाविकास आघाडीत असूनही मित्र पक्षाच्या नेत्यांसोबत न जाता कार्यकर्त्यांच्या ग्राहकाखातर त्यांनी स्वतः वेगळी यंत्रणा राबवली. त्यांनी गावोगावी मेळावे घेतले त्या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शेखर गोरे यांचा दरम्यानच्या काळात आत्मविश्वासही चांगलाच वाढला.
गेल्या महिन्यापासूनच शेखर गोरे यांनी धैर्यशील मोहिते पाटील विजय होतील असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे कार्यकर्ते चार्ज होऊन कामाला लागले. जवळपास राष्ट्रवादी पेक्षाही जोमाने कामाला लागलेल्या शेखर गोरेंमुळे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाल्याची चर्चा माढ्यासह सातारा जिल्ह्यात रंगली आहे, त्यामुळे शेखर गोरेच माढ्याचे किंगमेकर असल्याचे मत त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
#dahiwadi
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 5th Jun 2024 03:53 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 5th Jun 2024 03:53 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 5th Jun 2024 03:53 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 5th Jun 2024 03:53 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 5th Jun 2024 03:53 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 5th Jun 2024 03:53 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Wed 5th Jun 2024 03:53 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 5th Jun 2024 03:53 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 5th Jun 2024 03:53 pm













