सातारा जिल्हा न्यायालयातील खासगी वकिलाला 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

सातारा  : सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी खासगी वकिलाला अटक केली आहे..जिल्हा न्यायालयातील विलास बाळकृष्ण कुलकर्णी असे खासगी वकिलांचे नाव असून खासगी वकिलाने 2 लाख रुपयांची मागणी करत 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले आहे..

तक्रारदार हे स्वातंत्र्य संग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून संस्थेच्या वतीने सातारा दिवाणी न्यायालय यांच्या कोर्टात दाखल प्रोबेट अर्ज क्रमांक 16/ 2020 चा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून घेण्याकरता लोकसेवकावर प्रभाव पाडून खाजगी वकील यांनी तक्रारदार यांच्याकडे 2 लाख रुपयांची लाच मागितली होती त्यापैकी 1 लाख रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आली आहे.. पोलीस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक तयार करून ही कारवाई करण्यात आली आहे.. या कारवाईमुळे जिल्हा न्यायालय खळबळ उडाली आहे.. खासगी वकीलावर झालेली आत्तापर्यंतची ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे..
 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये वकील विलास कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे..

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला