खडकी ता वाई सुंदरनाथ पतसंस्थेचे काम कौतुकास्पद पत्रकार श्री जयवंत पिसाळ
बापू वाघ - Sun 23rd Oct 2022 09:02 am
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज / बापू वाघ ( वाई )
सहकारात गावाचा विकासात्मक बदल करण्याची ताकद असते परंतु सोबत अध्यात्मिक व धार्मिक अधिष्ठान असेल तर तो कुटुंबातील सदस्यसह समाजाचा आनंद ठरतो यासाठी संतांनी व थोर नेत्यांनी जपलेली सहकार चळवळ जपू या असे प्रतिपादन भुईंज प्रेस क्लवचे संस्थापक पत्रकार जयवंत पिसाळ यांनी केले.
खडकी ता. वाई येथे सुंदरनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित खडकी यांच्या सभासदांना लाभांश वाटप व परिसंवाद मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस क्लवचे संस्थापक पत्रकार जयवंत पिसाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी भुईज जि.प. गटाचे नेते पै. जयवंत पवार होते. तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे संस्थापक चेअरमन ह. भ. प. अरविंदबुवा शिंगटे होते.
यावेळी बोलताना पत्रकार जयवंत पिसाळ पुढे म्हणाले की कृष्णा नदीच्या काठावर वसलेले खडकी गाव समृद्ध वारसा शेती व्यवसाय जोपासत गुण्यागोविंदाने नांदत आहे. इथली विकासाची वाट सहकारातून सुरू झाली. यातूनच २१ वर्षापुर्वी संस्थापक ह. भ. प. अरविंदबुवा शिंगटे यांनी स्थापन केलेली सुंदरनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था प्रत्येकाला मदत करत बचतीचा मंत्र जोपासत लहान गावात सुद्धा एक कोटीच्यावर ठेवी गोळा करते त्यांनी जपलेला विश्वास सभासदांना नक्कीच कौतुकास्पद आहे. असे ही ते यावेळी म्हणाले. म्हणूनच सहकारात गावाचा विकासात्मक बदल करण्याची ताकद असते.
तर यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना पै. जयवंत पवार म्हणाले की खडकी गावात सहकार शेती यांना धार्मिक चळवळीचे अधिष्ठान आहे त्यामुळे इथे पारदर्शकता असून संस्था चालवणारे पदाधिकारी संचालक यांचे योगदान अभिमानास्पद आहे. त्यांनी जपलेला विश्वास व सभासदांच्या इच्छा नक्कीच नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतील असे ही ते म्हणाले.
कार्यक्रमास किसनवीर कारखान्याचे संचालक संजय कांबळे, सरपंच सौ. सरोज शिंगटे, संस्थेचे जेष्ठ संचालक बाळासाहेब शिंगटे पाटील, माजी सरपंच प्रकाश शिंगटे, सोसायटी माजी चेअरमन नंदकुमार शिंगटे व सभासद संचालक उपस्थित होते. सचिव संजय सुर्वे यांनी सुत्र संचालन केले तर आभार नंदकुमार शिंगटे यांनी मानले.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 23rd Oct 2022 09:02 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 23rd Oct 2022 09:02 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 23rd Oct 2022 09:02 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 23rd Oct 2022 09:02 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 23rd Oct 2022 09:02 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 23rd Oct 2022 09:02 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 23rd Oct 2022 09:02 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 23rd Oct 2022 09:02 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 23rd Oct 2022 09:02 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 23rd Oct 2022 09:02 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 23rd Oct 2022 09:02 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 23rd Oct 2022 09:02 am













