आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही उदात्त भावना प्रत्येकाने मनात ठेवली तर नक्कीच समाज सेवा हीच ईश्वर सेवा ठरू शकते-राजेंद्रशेठ राजपुरे
लहू चव्हाण- Thu 17th Nov 2022 10:00 am
- बातमी शेयर करा
पाचगणी, : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही उदात्त भावना प्रत्येकाने मनात ठेवली तर नक्कीच समाज सेवा हीच ईश्वर सेवा ठरू शकते.असे गौरवोद्गार जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी काढले.
पांचगणी येथील प्रसिद्ध धनंजय उद्योग समूहाचे ' धनंजय फूड प्रोडक्ट्सचे ' वतीने कै. कृष्णाबाई विठ्ठल परदेशी यांचे स्मरणार्थ नंदकुमार विठ्ठल परदेशी व धनंजय विठ्ठल परदेशी यांचे सौजन्याने जि. प. प्राथमिक शाळा खिंगर येथील ९० विद्यार्थी व शिक्षक यांना स्पोर्ट्स ड्रेसचे नुकतेच वाटप प्रसंगी राजपुरे बोलत होते यावेळी खिंगरचे सरपंच दिनकर मोरे, उपसरपंच विठ्ठल दुधाणे, माजी सरपंच अशोक दुधाणे, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र पवार, आंब्रळ विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप आंब्राळे, युवा उद्योजक नितीनशेठ दुधाणे, युवा उद्योजक व उपाध्यक्ष रोटरी क्लब पांचगणी, स्वप्निल परदेशी व परदेशी परिवार, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन दुधाणे, ग्रामसेविका सपना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.राजपुरे पुढे म्हणाले मराठी शाळा हळूहळू कात टाकत असून, डिजिटल क्रांतीमुळे शाळेत विद्यार्थी आनंदाने व उत्साहाने येत असून, पटसंख्यादेखील वाढत आहे.
कै. कृष्णाबाई विठ्ठल परदेशी यांचे स्मरणार्थ नंदकुमार विठ्ठल परदेशी व धनंजय विठ्ठल परदेशी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच खेळाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय पार्टे यांनी सुत्रसंचलन केले.शंकर दुधाणे यांनी आभार मानले.
यावेळी शिक्षक,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 17th Nov 2022 10:00 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 17th Nov 2022 10:00 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 17th Nov 2022 10:00 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 17th Nov 2022 10:00 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 17th Nov 2022 10:00 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 17th Nov 2022 10:00 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 17th Nov 2022 10:00 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 17th Nov 2022 10:00 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 17th Nov 2022 10:00 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 17th Nov 2022 10:00 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 17th Nov 2022 10:00 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 17th Nov 2022 10:00 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 17th Nov 2022 10:00 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 17th Nov 2022 10:00 am













