बंडखोरांसमोर नवे पर्याय? एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दुसऱ्यांदा फोन,
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेगSatara News Team
- Tue 28th Jun 2022 08:07 am
- बातमी शेयर करा
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीही अद्याप पुढचा रस्ता स्पष्ट झालेला नाही. भाजपची याला फूस असल्याचा बातम्या समोर येत आहेत. त्यातच फडणवीस यांचं दिल्लीतील नेत्यांसोबत बैठक सत्र वाढलं आहे.
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यास भाजपकडून सत्तास्थापनेसाठी तयारी सुरू आहे. मात्र, घटनात्मक बाबी अद्याप पेंडिंग आहेत. याशिवाय बंडखोर आमदारांच्या निलंबनावर शिवसेना ठाम असल्याने या प्रकऱणातील कायदेशीर पेचही वाढला आहे. त्यामुळे शिंदे गटातर्फे भाजव व्यतिरिक्त पर्यायांची चाचपणी सुरू आहे. यातच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दुसऱ्यांना फोन केल्याचं समोर आलंय.
सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात तब्बल 40 आमदार आहेत. शिवसेनेच्या एकूण 54 आमदारांपैकी 40 आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे.
मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला कोणतं वळण लागलं. याकडे पाहाणं गरजेचं आहे. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचं खरं हिंदुत्व हेच असल्याचं म्हटलं. खरी शिवसेना त्यांचीच असल्याचंही शिंदे म्हणाले. सध्या राज ठाकरेही प्रखर हिंदुत्वावर भाषणं देत आहेत.
कायदेशीर पेच कायम
शिंदे गटाला एखाद्या पक्षात एंट्री करावी लागणार आहे. नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कारवाईपासून वाचवायचं असेल तर एकूण संख्याबळापैकी दोन तृतीयांश संख्या गटाला आवश्यक असते. पण तो गट एखाद्या पक्षात विलिन करावा लागतो. सध्या शिंदे यांच्याकडे संख्या असली तरीही, 16 आमदारांवर कारवाईचा बडगा आहे. यामुळे शिंदे गटाकडून मनसेचा पर्याय आजमावण्याचा विचार होऊ शकतो.
MaharashtraPolitics
EknathShinde
RajThackeray
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 28th Jun 2022 08:07 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 28th Jun 2022 08:07 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 28th Jun 2022 08:07 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 28th Jun 2022 08:07 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 28th Jun 2022 08:07 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 28th Jun 2022 08:07 am
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Tue 28th Jun 2022 08:07 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 28th Jun 2022 08:07 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Tue 28th Jun 2022 08:07 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Tue 28th Jun 2022 08:07 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Tue 28th Jun 2022 08:07 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Tue 28th Jun 2022 08:07 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Tue 28th Jun 2022 08:07 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 28th Jun 2022 08:07 am













