जो पर्यंत काका धुमाळ सारखी लोक खा.उदयनराजे यांच्या जवळ आहेत तो पर्यंत त्यांना उतरती कळा येणार....विक्रम पवार

सातारा : साताऱ्यातील बाजार समितीमध्ये अजिंक्य पॅनलने म्हणजेच शिवेंद्रराजे भोसले यांच्या पॅनलने 18/0 करत उदयनराजे यांच्या पॅनलला धूळ चारली होती यावरून अजिंक्य पॅनलचे विक्रम पवार यांनी काका धुमाळ यांच्यावर निशाणा साधत काका धुमाळ यांचे आभार मानले आहेतजोपर्यंत काका तुम्हाला सारखे कार्यकर्ते उदयनराजे जवळ आहेत तोपर्यंत उदयनराजे यांची महाराष्ट्रात नाचकी होणार.काल बाजार समितीत जो उदयनराजे गटाचा दारून पराभव झाला याला उदयनराजे यांचे जवळचे काका धुमाळ हे जबाबदार असल्याचे विक्रम पवार यांनी सांगितले. काका धुमाळ हे स्वतः मार्केट कमिटी कमिटीचे संचालक आहेत तरीसुद्धा त्यांना स्थानिक उमेदवार देता आला नाही. उमेदवार असे दिले की ज्यांचा मार्केट कमिटी कमिटीशी काही एक संबंध नाही त्यामुळेच काका धुमाळ यांच्यामुळेच उदयनराजेंचा पॅनल पडले असल्याचे सांगत येणाऱ्या काळात सुद्धा काका धुमाळ हे मला असं सहकार्य करतील आणि त्यांच्यासारखे चांगले मित्र मला लाभल्याने मी त्यांचे धन्यवाद मानतो काका तुम्हाच्या सारखे माणसं जोपर्यंत उदयनराजेंच्या पॅनलमध्ये आहेत तोपर्यंत त्यांचा उतरता लेक राहणार आणि आमचा चढता लेख राहणार असेही विक्रम पवार यांनी घनाघात केला आहे. काका धुमाळ यांनाच आमच्या अजिंक्य पॅनलच्या विजयाचे श्रेय देत आहे असेही विक्रम पवार यांनी सांगितला आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त