युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल

सातारा : युवतीला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी राहुल राजेंद्र निकम वय 30 रा. शामसुंदर बंगला, करंजे, सातारा. याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ज्या प्रकरणी शाहूपुरी पोलीस कडून मिळालेली माहिती अशी की टीव्ही सिरीयल मध्ये काम करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या एका तरुणीची ओळख 2019 मध्ये इंस्टाग्राम वर झाल्यानंतर राहुल निकम  व तक्रारदार युवतीचे रूपांतर मैत्रीत झाले. फोनवर वारंवार एकमेकांशी बोलणे होत असतानाच राहुल याने संबंधित युवतीला शाहू काला मंदिर येथे भेटण्यास बोलवले त्यानंतर राहुल निकम यांनी संबंधित युवतीला आपल्या घरी नेऊन त्याच्या कुटुंबीयांना तिची ओळख करून दिली. मला ही मुलगी खूप आवडते मी हिच्याशी लग्न करणार आहे असं सांगितल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी सुद्धा लग्नास होकार दिला. त्यानंतर राहुल निकम याने संबंधित युवतीला कास पठार, स्वामी समर्थ मंदिर ,अक्कलकोट, व वाळवा जिल्हा सांगली येथे बहिणीच्या घरी कुटुंबासमवेत फिरायला गेला. त्यानंतर संबंधित युवतीच्या घरी येऊन मी तिच्यासोबत लग्न करणार आहे असे सांगून विश्वास संपादन करून शरीर सुखाची मागणी करू लागला. संबंधित युवतीने लग्न झाल्यानंतर हे सर्व करू असे सांगितल्यानंतर राहुल निकम याने जबरदस्तीने व मारहाण करत त्याच्या राहत्या घरी जबरदस्ती व इच्छेविरुद्ध  शरीर सुख घेतले त्यानंतर संबंधित युवकाने साताऱ्यातील बऱ्याच ठिकाणी 2020 ते 2025 पर्यंत वारंवार शरीर सुखाची मागणी करून इच्छेविरुद्ध संबंध ठेवले संबंधित युवती ही गरोदर राहू नये याकरिता वेळोवेळी गर्भनिरोधक गोळ्या देखील त्याने दिल्या 2025 मध्ये संबंधित युवतीने लग्नासाठी तकादा लावल्याने संबंधित युवकाने मला माझा बॉडी बिल्डिंग चा सराव चालू आहे मला स्वतःच्या पायावर उभा राहून दे आपण थोड्या दिवसात लग्न करू तु माझी बायको आहेस हे मी सर्वांना सांगितला आहे. तसेच आपले फोटोही मी सोशल मीडियावर टाकतो त्यामुळे सर्वांना आपल्याबद्दल माहित आहे. असा विश्वास संपादन केला. परंतु संबंधित युवतीच्या घरातील लोकांनी राहुल निकम याच्या घरी जाऊन लग्ना संदर्भात विचारले असता आम्ही आमच्या मुलाचे तिच्यासोबत लग्न करू शकत नाही असे ठणकावून सांगितले. यानंतर संबंधित युवतीने विशेष महिला पोलीस पथक यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर राहुल निकम व त्याच्या नातेवाईकांनी समझोता करून विशेष महीला पोलीस पथकात आम्ही आमच्या मुलाचे लग्न त्या मुलीशी करून देऊ असे लिहून दिले. परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे बोलणे संबंधित युवतीशी झाले नसल्याने राहुल राजेंद्र निकम रा. शामसुंदर बंगला करंजे ता. जि. सातारा याच्या विरोधात संबंधित युवतीच्या सांगण्यावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये लग्नाचे अमीश दाखवत वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध करून लग्न करण्यास नकार दिल्याप्रकरणी संबंधित युवतीने तक्रार दाखल केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला