सातारा पंढरपूर महामार्गावरील पुसेगाव येथील बंदिस्त नाल्याचे काम सुरु न केल्यास आत्मदहन करणार - गणेश जाधव

 पुसेगाव : मेघा इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनी लिमिटेड व एम एस आर टी सी यांनी 20 सप्टेंबर 2023 पूर्वी सातारा पंढरपूर महामार्गावरील पुसेगाव लगत असणाऱ्या पुसेगाव मधील रस्त्याच्या कडेच्या बंदिस्त नाल्याचे काम सुरू न केल्यास दिनांक 21 रोजी निढळ येथील मेघा इंजीनियरिंग कंपनीच्या ठिकाणी आत्मदहन करणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश जाधव यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
 पुसेगाव तालुका खटाव येथील सातारा पंढरपूर महामार्गाच्या लगत बंदिस्त नाल्याचे काम बरेच महिने झाले रखडलेले आहे. सध्या पाऊस काळ सुरू आहे. पण गेल्या तीन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने या पावसाच्या पाण्याने अजून पर्यंत कोणाच्या दुकानात किंवा घरात पाणी घुसले नाही, व व्यावसायिकांची नुकसान हानी झाली नाही,येणारी नक्षत्रे ही मोठ्या पावसाची असून, इथून पुढील काळात मोठा पाऊस झाल्यास अनेक लोकांच्या घरामध्ये तसेच व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी भरले जाते. यामुळे दुकानदाराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते.त्यामुळे पाऊस काळात दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. व अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
    संबंधित विभागाच्या ठेकेदारांना वारंवार सांगून पत्रव्यवहार करून दुकानदार व व्यापारी यांच्या सह्यांची मोहीम राबवून, त्याचबरोबर पुसेगावातील विविध पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको, अमरण उपोषण, पूर्ण गाव बंद ठेवून कितीतरी वेळा या कामासंबंधी आपला रोष व्यक्त केला आहे. एवढे सगळे करूनही ठेकेदार व प्रशासनावर कोणताही परिणाम झाला नाही.
 पुसेगाव हे  श्री सद्गुरु सेवागिरी महाराज यांचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र देवस्थान आहे. महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात. त्यांनाही या समस्यांचा सामना करावा लागत आहे. वरील सर्व गोष्टीस अनुसरून मेघा इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनी लिमिटेड व एम एस आर डी सी यांनी दि.20 पूर्वी कामास प्रारंभ न केल्यास दि.21 सप्टेंबर रोजी संबंधित ठेकेदाराच्या निढळ येतील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा ग्रामपंचायतचे सदस्य गणेश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यासह विविध विभागास निवेदनाद्वारे कळविले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला