ऊस तोडीच्या पैशाच्या कारणावरून चुलत्याचा खून पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा

म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी..

आंधळी ता : २९ म्हसवड तालुका माण पोलीस स्टेशन हद्दीतील कारंडेवाडी(कुकुडवाड) येथील ऊस तोडीचे पैशाच्या कारणावरून चुलत्याचा खून केल्याप्रकरणी पुतण्यास पकडण्यात आले होते त्याच्यावर म्हसवड पोलिसांनी साक्षीदार जबाब देवून आरोपीस कलम ३०२ अन्वेय दोषी ठरवून पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा व 5 हजार रुपये दंड करण्यात आला असून याबाबत म्हसवड पोलिसांनी आरोपी शिक्षा लागण्याकरता मेहनत घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली. 


 याबाबत सविस्तर माहिती अशी की आरोपी संदीप वसंत चव्हाण वय 28 वर्ष रा. कारंडेवाडी ता. माण याने ऊस तोडीचे पैशाच्या कारणावरून भांडण करून त्याच्या घराच्या अंगणात झोपलेला असताना धावून जाऊन घरातील मटण कापण्याचा सुरा घेऊन त्याने मयत लक्ष्मण आण्णा चव्हाण वय ४९ वर्ष यांच्या गळ्यावर सुरा मारून गंभीर जखमी करून खून केला.


 सदर गुन्ह्यात सहा.पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी साक्षीदाराचे जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा करून तपास करत आरोपी विरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय वडूज येथे दोषारोप पत्र दाखल केले न्यायालयात सरकारी वकील अजित प्रताप कदम यांनी या केस मध्ये काम पाहिले व पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात येऊन वैद्यकीय पुरावा,कागदपत्रे पुरावा व सरकारी वकीलचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश हुदार यांनी भादविसा कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून आरोपी संदीप वसंत चव्हाण यास जन्मठेपेची शिक्षा पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली सदर खटला चालवणे कामी उपविभागी पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, सपोनि.अक्षय सोनवणे म्हसवड पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले तसेच पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव म.पोलीस हवा. विजयालक्ष्मी दडस, पोलीस कॉन्स्टेबल सागर सजगणे, अमीर शिकलगार, जयवंत शिंदे,यांनी सहकार्य केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त