गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक

सातारा : कराड तालुक्यातील भवानवाडी येथे जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करुन दहशत माजविणारे चौघा आरोपींना उंब्रज पोलीसांनी २ तासात अटक केली आहे. तसेच चौघांकडून सुमारे १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सबंधित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोन्या ऊर्फ ऋषिकेश गुलबा सुर्यवंशी, मकरंद गुलबा सुर्यवंशी (दोघे रा. सुर्यवंशी मळा, चरेगांव ता. कराड), पुंजाराम सुखदेव पाखरे (सध्या रा. सुर्यवंशी मळा, चरेगांव ता. कराड, मुळ रा. पोकळवड ता.जि. जालना), राज अकुंश आवळे (रा. खालकरवाडी ता. कराड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १८/०३/२०२५ रोजी रात्री ८.३० वा. सुमारास भवानवाडी ता. कराड जि. सातारा गावचे हद्दीत फिर्यादी यांचे ऊसतोड कामगांराची व आरोपी मकंरद गुलाब सुर्यवंशी याचे ट्रॅक्टर ड्रायव्हर पाखऱ्या यांची भांडणे झाली होती याचा राग मनात धरुन आरोपी सोन्या ऊर्फ ऋषिकेश गुलबा सुर्यवंशी, मकरंद गुलबा सुर्यवंशी, पुंजाराम सुखदेव पाखरे, राज अकुंश आवळे यांनी स्कुटी व बुलेट मोटारसायकलवरुन आले. यावेळी सोन्या ऊर्फ ऋषिकेश गुलाब सुर्यवंशी याने सिंगल बोर बंदुकीने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचे अंगावर फायर केला. फिर्यादींनी बंदुकीचा बॅरल वर ढकलल्याने तो राऊंड फिर्यादीचे कानाजवळून गेला. मकरंद सुर्यवंशी व पुंजाराम पाखरे यांनी फिर्यादी यांचे ऊसतोड कामगार मुकेश पतीराम पाटील यास हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. ऋषिकेश सुर्यवंशी याने हवेत बंदुकीतून चार राऊंड फायर करुन, दहशत करुन आरोपींत यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन “तुला आज रात्री जिवंत ठेवत नाही,” अशी धमकी देवून निघून गेले. याबाबत उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तक्रार दाखल झाल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांना सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे बाबत मार्गदर्शन व सुचन दिल्या. त्याप्रमाणे रविंद्र भोर यांनी स्वतः पोलीस अधिकारी, अंमलदार यांचेसह भवानवाडी, खालकरवाडी, चरेगांव या भागामध्ये पेट्रोलींग करुन आरोपींचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून गुन्ह्याचे तपास कामी अटक केली. त्यानंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ०५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली बंदुक, रिकाम्या पुंगळ्या व मोटर सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे हे स्वतः करीत आहेत.


आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त