पत्नीचा खून, मृतदेह बॅगेत घेऊन जाणाऱ्या पतीला शिरवळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Satara News Team
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
- बातमी शेयर करा

सातारा : मुंबई येथून एक महिन्यापूर्वी बंगळूर (कर्नाटक) येथे राहण्यासाठी पत्नी गौरीसह गेलेल्या पत्नी राकेश याने हिची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना बुधवारी घडली. पत्नी गौरीची चाकूने भोकसून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून तो बथरूममध्ये ठेऊन मुंबईच्या दिशेने पळून निघालेल्या आरोपी राकेश खेडेकर याला शिरवळ पोलिसांनी शिरवळ हद्दीत गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.
यावेळी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या राकेशला शिरवळ पोलिसांनी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यानंतर बंगळूर पोलिसांच्या त्याला ताब्यात घेतले. पत्नीचा खून केल्यानंतर पती राकेशने स्वतः विष प्राशन करुन जीवन सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिरवळ पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी अंती त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. राकेश राजेंद्र खेडेकर (वय 35, रा. जोगेश्वरी मुंबई) असे आरोपी पतीचे नाव आहे तर गौरी सांबरेकर (वय 32) असे हत्येत मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश राजेंद्र खेडेकर (वय 36) पती आणि त्याची पत्नी गौरी सांबरेकर (वय 32) हे दोघे मुंबईत राहत होते. महिनाभरापूर्वीच राकेश आणि गौरी हे दोघे बंगळुरुला राहायला गेले होते. हे दोघे दक्षिण बंगळुरुतील दोड्डकम्मानहल्ली परिसरातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. राकेश हा एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून व सध्या वर्क फ्रॉम होमचे काम करीत होता तर त्याची पत्नी गौरी जॉबच्याअ शोधात होती. दि. 26 मार्च रोजी रात्री राकेश याच्याकडे पत्नी गौरी हिने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. दोघांच्यामध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. नंतर गौरी घरातील भांडी आपटू लागली. तेव्हा पती राकेशने आपण आता राहत असलेल्या रूमचे डिपॉझिट भरलेले आहे. आपण जर रूम सोडली तर डिपॉझिटचे पैसे मिळणार नाहीत व येथे येण्यासाठी खूप खर्च झाला आहे. असे तिला समजावीत होता. तरीही गौरी ही त्याचे ऐकत नसल्यामुळे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. शेवटी पत्नी सौ गौरी हिने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची भीती दाखवली. त्याचा राग राकेशला आल्याने राकेशने तिच्या हातातील चाकू घेऊन पत्नी गौरीचे मानेवर, गळ्यावर पाठीवर चाकूने वार केले व तिचा खून करून राकेश मुंबईकडे रवाना झाला. यावेळी त्याला शिरवळ पोलिस ठाण्याच्या पोलीसांनी गुरुवारी रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत कृष्णा नलावडे, पोलीस हवालदार कुंभार, नलावडे, धुमाळ, मोहरे पोलीस शिपाई दीपक पाले पवार व होमगार्ड याच्या पथकाने केली.
स्थानिक बातम्या
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
रहिमतपुरात अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेचालकावर कारवाई
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
संबंधित बातम्या
-
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
-
ऊस तोडीच्या पैशाच्या कारणावरून चुलत्याचा खून पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
-
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
-
दुर्लक्षित औंध पोलिस ठाण्यावर एसपी साहेबांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
-
रहिमतपुरात अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेचालकावर कारवाई
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
-
वाठार पेट्रोल पंपावरील दरोड्याप्रकरणी तिघे गजाआड
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
-
एसपीसाहेब कायद्याला न जुमानणाऱ्या 'समीर'ला मोक्का लावाच!
- Fri 28th Mar 2025 07:31 pm
-
घरफोडीच्या आरोपींना 2 तासात अटक करुन 60 हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत
- Fri 28th Mar 2025 07:31 pm