रहिमतपुरात अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेचालकावर कारवाई

सातारा : रहिमतपुर शहरातील ए.जेएस. कॅफे अँड चायनिज कॅफेवर काही प्रेमी युगल अश्लील चाले करताना आढळल्याने रहिमपूर पोलिसांनी कारवाई करत कॅफेचालकास अटक केली आहे. 

 याबाबत रहिमपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिमतपुर शहरात असणाऱ्या ए. जेएस. कॅफे अँड चायनिज, वाठार रोड, रहिमतपुर येथे काही अल्पवयीन युवक युवती या कॅफेतील बनविलेल्या कपार्टमेंट मध्ये अश्लील चाळे करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने सपोनि सचिन कांडगे यांनी पोउपनि जी.बी.केंद्रे व पोलीस पथकास ए. जेएस. कॅफे ॲण्ड चायनिज, वाठार रोड, रहिमतपुर येथे जावुन शहानिशा करुन कारवाई करणेबाबत आदेशित केलेनुसार पोउपनि जी. बी. केंद्रे व पोलीस पथकाने कॅफेमध्ये जावुन पाहणी केली असता रहिमतपुर पंचक्रोशीतील युवक व युवती अश्लील चाळे करताना दिसुन आले. त्यातील काही युवती या अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्याने सदरबाबत कॅफेचालक अमर रामचंद्र जाधव (रा. साप, ता.कोरेगांव) व संबंधित कॉलेज युवकांविरुध्द रहिमतपुर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
 सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, उपविभागिय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांचे मार्गदर्शनाखाली रहिमतपुर पोलीस ठाणेचे सपोनि सचिन कांडगे, पोउपनि जी. बी. केंद्रे, सफौ. जे. आर. पवार, पो.ना. एस.बी. शिंदे, पो.कॉ.एम.एस.देशमुख, म.पो.कॉ.एम.टी.कांबळे, डी. जे. गिरी. एस. एस. पाटोळे यांनी केलेली आहे.

 तसेच रहिमतपुर पोलीस ठाणेकडुन रहिमतपुर पोलीस ठाणे हददीतील सर्व कॅफेचालकांनी त्यांचे कॅफेमध्ये अल्पवयीन युवक व युवती यांना प्रवेश दिल्यास व कॅफेमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळुन आल्यास संबंधित कॅफेचालकाविरुध्द कडक कारवाई करण्याचा इशारा देणेत आलेला आहे. तसेच संबंधित ए.जेएस. कॅफे अँड चायनिज, वाठार रोड, रहिमतपुर या कॅफेचा परवाना रदद करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त