वाठार पेट्रोल पंपावरील दरोड्याप्रकरणी तिघे गजाआड

पोलीसांचा 5 जिल्ह्यात पाठलाग; पंपावरील कामगाराचाही समावेश

सातारा : कराड शहर जवळच वाठार या ठिकाणी दहा मार्च रोजी रात्री 12 च्या सुमारास मोटरसायकल वरून आलेल्या दोन युवकांनी कोयत्याने वार करत पंपावर काम करत असलेल्या कामगारांच्या गळ्यातील पैशाची कातडी बॅग हिसकावून घेऊन पलायन केले होते या बाबत दाखल तक्रारीनुसार तालुका पोलिसांनी दिवसरात्र मेहनत घेत गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या अखेर मुसक्या आवळल्या यात एकूण घटनेत या कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न झाला असे cctv मध्ये दिसते तोच यात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या बाबत घडलेली हकीकत अशी की कराड तालुका पोलिस ठाण्यात दि 11 मार्च रोजी वाठार येथील गणेश पेट्रोलपंप येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला या घटनेची CCTV फुटेज समाज माध्यमावर व्हायरल झाली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने तपास करण्याचा सूचना दिल्या होत्या त्या अनुषणगाने कराड तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी महेंद्र जगताप यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडुकर मॅडम व विभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालूका पोलीस ठाण्याच्या दोन स्थानिक गुन्हे शाखेची एक अश्या तीन टीम तयार करून आरोपींच्या मागावर लावल्या. Cctv फुटेज आणि टेक्निकल अनालीसेस आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने एका संशयितांची ओळख पटली मात्र तो वारंवार आपले लोकेशन बदलत होता तपास पथक त्याच्या मागावर सातारा,सांगली, कोल्हापूर रत्नागिरी अश्या चार जिल्ह्यात शोध घेत होती अखेर सांगली येथील रोहित उर्फ दादया सुदाम कदम त्यास पकडण्यात पथकाला यश आले त्याचा कडे कसून तपास केला असता त्याने सदर गुन्हा त्यानेच केल्याची कबुली दिली त्याच्या सोबत दुचाकी चालविणाऱ्या मुलास अगशिवनगर मलकापूर येथून ताब्यात घेतले असता तो अल्पवयीन असल्याचे दिसून आले 


या प्रकरणात प्राप्त आरोपी दादया कदम कडे कसून तपास केला असता या संपूर्ण घटनेचा मास्टरमाईंड हा कराड अटके येथील किशोर चव्हाण हा असून त्याने त्याच्या गावातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या परशुराम दुपटे याच्याशी संगनमत करून सदर चोरीचा प्लॅन आखला होता असे समोर आले कराड तालुका पोलीस डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी सदर गुन्ह्यात चोरीला गेलेली रक्कम, या कामी वापरलेले मोबाईल, दुचाकी असा ऐवज आरोपींकडून हस्तगत केला या जबरी चोरी प्रकरणात मुख्य मास्टरमाइंड किशोर चव्हाण रा. अटके, पेट्रोल पंपावरील सामील कर्मचारी परशुराम दुपटे,सांगली येथील प्रत्यक्षात चोरी करणारा दादया कदम व एक अल्पवयीन अशा चौघांना या घटनेत अटक केली.

 अशा प्रकारे कराड तालुका पोलीस ठाण्याचे पो नि महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनि श्री.सखाराम बिराजदार यांनी आरोपीचा चार जिल्ह्यात पाठलाग करत अखेर 15 रोजी या संशयितांच्या मुसक्या आवळल्या या तपासात पोलीस उप निरीक्षक नितीन येळवे, पोलीस हवालदार सचिन निकम, उत्तम कोळी, पोलीस नाईक विनोद माने, किरण बामणे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र देशमुख, प्रफुल्ल गाडे, मोहित गुरव, यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शखाली काम केले जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडुकर मॅडम विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी गुन्हा उघड करणाऱ्या पथकाचे कौतुक व आणि अभिनंदन केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त