राजाचे कुर्ल्यातील युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.
पुसेसावळी येथील "त्याच" सावकारावर १५ दिवसांत दुसरा गुन्हा दाखल..आशपाक बागवान.
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : औंध पोलिस ठाण्यात दिनांक १७/१०/२०२५ रोजी अकस्मात मयत नंबर ४२/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे गावचे हद्दीत पाळक नावचे शिवारात पिपरन च्या झाडास गळफास लावून घेऊन प्रसाद रामचंद्र उमापे, वय २४ वर्षे, रा. राजाचे कुर्ले, ता.खटाव हा मयत झालेला आहे. तरी झाले मयताचा तपास व्हावा अशा प्रकारे उमेश रघुनाथ उमापे याने दिलेल्या खबरी वरून नोंद घेण्यात आली होती. त्याच्या तपासा दरम्यान सदरची आत्महत्या ही सावकारीच्या त्रासातून झाली असल्यची माहिती संबंधित मयताच्या आज्जी ने दिल्यानंतर संबंधित सावकारा विरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १५३/२०२५ हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तपासांतर्गत मयताची आज्जी सुगंधा अंकुश उमापे, रा. राजाचे कुर्ले यांनी १७/१०/२०२५ रोजीचे दोन वर्षापुर्वी (नक्की तारीख वेऴ माहीत नाही) माझा नातु प्रसाद रामदास उमापे रा.राजाचे कुर्ले, ता.खटाव याने मोबाईल खरेदी करणेकरीता उदय आनंदराव माऴवे, रा. वंजारवाडी, ता.खटाव याचे कडुन वीस हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते त्याचे वेऴोवेऴी व्याज परत देऊनही तो पुन्हा-पुन्हा व्याजाची रक्कम मागुन आम्ही मांग जातीचे आहे हे माहीत असतानाही माझा नातु प्रसाद यास शिवीगाऴ करुन रस्त्यात अडवुन "ऐ मांगटया माझेकडुन घेतलेल्या पैशाचे व्याज दे. नाहीतर तुला गावात राहु देणार नाही." असे म्हणुन जातीवाचक शिवीगाऴ देत होता. तसेच आम्ही पुसेसावऴी येथे गेलो असता त्या ठिकाणी ही उदय माऴवे याने माझा नातु प्रसाद यास अडवुन व्याजाचे पैसे मागुन पैसे नाही दिले तर तुला व तुझ्या घरातील लोकांना सोडणार नाही अशी धमकी दिली.तसेच पऴशी येथे माझा नातु गेला असता त्या ठिकाणी त्यास व्याजाचे पैसे मागुन व्याजाचे बदल्यात नातु प्रसाद याचेकडील मोटर सायकल व मोबाईल काढुन घेतला होता. तसेच व्याजाचे पैसे देणेकरीता वांरवार जातीवाचक शिवीगाऴ करुन कुटूंबाला मारण्याची धमकी देवुन त्रास देत असल्याने त्या त्रासाला कंटाऴुन दिनांक १७/१०/२०२५ रोजी माझा नातु प्रसाद उमापे याने दोरीने गऴफास घेवुन मयत झाला आहे .
उदय आनंदराव माऴवे याने माझा नातु प्रसाद यास आत्महत्या करणेस भाग पाडले म्हणुन माझी उदय आनंदराव माऴवे रा.वंजारवाडी ता.खटाव याचेविरुध्द तक्रार आहे.वगैरे मजकुरची खबर औंध पोलीस ठाणे अकस्मात मयत नं 42/2025 बी.एन.एस.एस. १९४ चे तपासादरम्यान दिलेने औंध पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १५३/२०२५ बी.एन.एस. कलम १०८, १२६(२), ३५२, ३५१(२), महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध अधिनियम कलम ३९, ४५, अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(२)(va), ३(१)(r), ३(१)(s), ३(१)(Y) अंतर्गत गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास रणजित एन.सावंत, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी, दहिवडी कॅम्प वडूज हे करत आहेत.
औंध चे मा.स.पो.नि. गणेश वाघमोडे यांचे सावकारीचा बिमोड करण्याच्या दिशेने वाटचाल....
"विद्यमान कारभाऱ्यांनी पदभार स्वीकारण्या पुर्वी खाजगी सावकारी करणाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रारी देण्यासाठी औंध पोलिस ठाण्यात जाण्यासाठी पिडितांना ऐकून, समजून घेण्याची आणि पिडितांना त्यांच्या हक्काचे असलेले न्याय मिळवून देण्यासाठीची जी मानसिकता या विद्यमान अधिकाऱ्यांची दिसून येते ती नव्हती. त्यामुळे गणेश वाघमोडे यांच्या कारकिर्दीत विनाकारण कोणासही त्रास होणार नाही. यासोबतच पिडितांना योग्य तो न्याय कसा मिळणार याची तळमळ दिसून येते. त्यामुळे औंध चे कर्तव्यदक्ष मा.स.पो.नि. गणेश वाघमोडे यांची सावकारीचा बिमोड करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. परंतू पिडितांनी निर्भिडपणे अन्ययाच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याची मानसिकता तयार करणे अपेक्षित आहे."
#pusesavali
स्थानिक बातम्या
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
संबंधित बातम्या
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
-
औंधमध्ये गुपचूप वाढणारे अवैध धंदे — प्रशासन आणि प्रस्थापितांचा मौन का?
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
-
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
-
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
-
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
-
ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'
- Tue 4th Nov 2025 12:38 pm
-
चोरीला गेलेले व गहाळ झालेले २० मोबाईल व ०१ टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलिसानी केले परत
- Tue 4th Nov 2025 12:38 pm












