औंधमध्ये गुपचूप वाढणारे अवैध धंदे — प्रशासन आणि प्रस्थापितांचा मौन का?

औंध : औंध हे एकेकाळी ज्ञानभूमी म्हणून ओळखले जायचे. ग. दि. माडगूळकर, साने गुरुजी, राजा गोसावी यांसारख्या दिग्गजांनी ज्या औंध संस्थानात शिक्षण घेतले, त्या संस्थेने नेहमीच शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना प्राधान्य दिले. आजही संस्था तरुणांसाठी रोजगार मेळावे आयोजित करून शेकडो युवकांना नोकरीची दारे खुली करत आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी असलेल्या या भूमीत अशी सकारात्मक कामे होत असताना, दुसरीकडे औंधमध्ये वाढत असलेल्या अवैध धंद्यांकडे मात्र प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष दिसून येते, हे दुर्दैवी वास्तव आहे.


औंध परिसरात चक्री, मटका, जुगार आणि विविध प्रकारचे सट्टेबाज धंदे उघड्यावर सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार होत आहे. या अवैध धंद्यांमुळे केवळ समाजाची हानी होत नाही, तर तरुणाईचे करिअर, वेळ आणि पैसा या काळ्याकुट्ट जाळ्यात अडकत चालले आहे.

यातून वाहणारा पैसा पुन्हा अवैध धंद्यातच गुंततो आहे — आणि यातून गुन्हेगारीला खतपाणी घातले जात आहे.


सगळ्यात चिंता वाढवणारी बाब म्हणजे,

पोलीस प्रशासनाचे वर्तन देखील संशयास्पद आणि उदासीन आहे.

भितीशून्य वातावरण निर्माण झाले असून, काहीजण तर उघडपणे म्हणत फिरतात की:

“काय झाले तरी औंध-पंचक्रोशीमध्ये धंदे थांबणार नाहीत.”


तर मग प्रश्न असा: या वाढत्या अवैध धंद्यांची जबाबदारी कोणाची?
पोलीस प्रशासनाची?
स्थानिक प्रस्थापित राजकारण्यांची?
की सत्तेच्या छायेत वाढणाऱ्या गुन्हेगारी गटांची?


शैक्षणिक वारसा जपणाऱ्या या भूमीला अवैध धंद्यांचे गड बनू देणे हे समाज, प्रशासन आणि नेतृत्व—तिन्हींकडून झालेलं मोठं अपयश आहे.औंध आणि पंचक्रोशीतील नागरिकांचा एकच सवाल—"अवैध धंद्यांवर कारवाई कधी? आणि कोणाच्या आदेशाने?"

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला