शरद पवारांमागे साताऱ्यातील सर्वसामान्य, पण साताऱ्यातील राजेंनी सोडली साथ
Satara News Team
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
- बातमी शेयर करा
सातारा : नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात साताऱ्यातून करताना शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन गुरुदर्शन घेतले. पण, त्यांचीच काही तत्त्वे अंमलात न आणल्यामुळे त्यांच्यापुढे काही अडचणी निर्माण झाल्या. काळानुसार त्यांनी घेतलेले निर्णय गरजेचे असतीलही, पण त्याचा फटका पक्षाला बसला हे मात्र नक्की. यशवंतराव चव्हाण यांनी राजघराण्याला सत्तेपासून लांब ठेवले होते. सर्वसामान्यांमध्ये सत्ता असली पाहिजे असे त्यांना वाटत होते. पण, शरद पवारांनी राजघराण्याचे जनमानसातील वाढलेले महत्त्व लक्षात घेता राजघराण्यात सत्ता दिली. आता हेच राजे पवारांना सोडून इतर पक्षात गेल्याने राष्ट्रवादीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करताना सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसमध्ये फार मोठी घराणेशाही करण्याचा प्रयत्न केला नाही. किसन वीर, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील यांना सत्तेच्या प्रवाहात सहभागी करून घेतले. जाणीवपूर्वक राजघराण्यांना बाजूला ठेवले. फलटणचे निंबाळकर घराणे राजकारणात असले तरी मालोजीराजे यांच्यानंतर काहीकाळ पोकळी निर्माण झाली होती.
साताऱ्यातील राजघराणी लांब जाण्यास केवळ त्यांचाच दोष आहे असेही नाही. तर, शरद पवारांनीदेखील दोन्ही दगडांवर हात ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राजघराण्यांना पक्षात सहभागी करून घेतले तरी सत्तेत सहभागी करून घ्यायला त्यांची फारशी मानसिकता नव्हती. त्यामुळे दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांना सत्तेत सहभागी करून घेतले तरीदेखील फारशी महत्त्वाची पदे मिळाली नाहीत.
कोल्हापूरचे राजे पक्षात आले अन् परत गेले
शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना लोकसभेसाठी उमेदवारी देऊन पक्षात घेतले. राजघराण्यांचा सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी वापर करता येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढविता येईल यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. पण, राष्ट्रवादीमध्ये ते रमले नाहीत. लोकसभेसाठी त्यांचा पराभव झाला आणि भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडली.
शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे अन रामराजे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीनही राजे असल्याने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होता. त्याला इतरांचीही साथ मिळत होती. पण, पक्षांतर्गत धुसफुस वाढली. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राष्ट्रवादीकडून फारसा विचार होईना. अजित पवारांनी शब्द दिला तरी शरद पवार ताकद देईनात म्हटल्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत निवडून येऊनही उदयनराजेंनी भाजपचाच झेंडा हातात घेतला. रामराजेंना तर शरद पवारांनी सर्वकाही दिले, पण अखेर तेही सोबत राहिले नाहीत
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटात धनशक्ती तेजस्वी' होणार की जनशक्तीची सरिता वाहणार?
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
-
फलटण नगरपालिका निवडणुकीतला पराभव राजे गटासाठी की शिवसेना एकनाथ शिंदेचा?
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
-
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
-
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
-
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
-
महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Wed 5th Jul 2023 09:06 pm
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची प्रचार सभा व रॅली
- Wed 5th Jul 2023 09:06 pm











