महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले

पाचवड:भुईंज महामार्गावर कवठे गावानजीक पुण्याहून सातारा कोल्हापूर कडे जाणाऱ्या खाजगी कुरियर कंपनीची पिकअप 7 ते 8 दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याने एकच खळबळ उडाली आहे,

    याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे सहा वाजता पुण्याहून कोल्हापूर चे दिशेने निघालेली पिकअप क्रमांक MH 09 f L 5423 या गाडीला कवठे गावानजीक उड्डाणपूलावर पाठीमागाहून आलेल्या तीन दुचाकी वरील इसमानी हत्यारे दाखवून गाडीच्या पाठिंमागील दरवाजा उघडून त्यातील एक बॉक्स ताब्यात घेत पलायन केले,

   दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर गाडी चालक विजय पवार याने  भुईंज पोलिसांत तक्रार दिल्यानंतर त्या बॉक्समध्ये तब्बल एक किलो सोन्याचे दागिने असल्याचे सांगण्यात आले,याबाबत भुईंज पोलिसांनी तातडीने तपासासाठी यंत्रणा सुरू केली तर काही माहिती व सी सी टीव्ही च्या फुटेज वरून पथके रवाना केली,

   सायंकाळी घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख वैशाली कडुकर पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल सावन्त,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे,यांनी भेट देऊन तपासणीसाठी मार्गदर्शन केले,

 या दरोड्याचे तपासासाठी भुईज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी डीवायएसपी पुनम झगडे एपीआय पृथ्वीराज ताटे पीएसआय आकाश मोरे सुरज शिंदे यांनी रात्री उशिरापर्यंत तपासणी पथके रवाना केली आरोपींना काही तासातच ताब्यात घेऊन वेट अँड वॉच असा विश्वास तपास पथकातील एका जबाबदार अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला तर दरोडातील सोने नेमके कुठले कोणती कंपनी व करिअर कंपनी कोणती याबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला